नवी
दिल्ली दि. 17 : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने शालेय
विद्यार्थ्यांकरिता आयोजित ‘राष्ट्रीय कला उत्सवात’ महाराष्ट्राने विविध कला
प्रकारात तीन पुरस्कार पटकविले.
येथील बालभवनात केंद्रीय मनुष्यबळ विकास
मंत्रालयाच्यातवीने दिनांक 12 ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत ‘राष्ट्रीय कला
उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
यांच्या हस्ते या कला उत्सवाचे उद्घाटन
झाले. देशभरातील विविध राज्यांतील
विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभाग घेतला, कला उत्सवात झालेल्या स्पर्धेत
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चित्रकलेत दोन आणि वादन कलेत एक असे एकूण तीन
पुरस्कार पटकाविले.
या कला उत्सवात गायन, वादन, नृत्य व
चित्रकेला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा व राज्यस्तरावर निवड झालेल्या
विद्यार्थ्यांची या उत्सवासाठी निवड झाली होती.
प्रत्येक कला प्रकारासाठी एक
विद्यार्थी व एका विद्यार्थीनीचा एक असे एकूण चार संघ महाराष्ट्राच्यावतीने
सहभागी झाले. आदिती सातपुते या विद्यार्थीनीने वादन कलेत मुलींमधून दुसरा तर
चित्रकला स्पर्धेत निलाक्षी पवार या विद्यार्थीनीने मुलींमधून तिसरा व अलोक गुप्ता
या विद्यार्थ्यांने मुलांमधून तिसरा
क्रमांक पटकविला.
येथील सिरीफोर्ट सभागृहात दिनांक 15 डिसेंबर 2018 रोजी केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिव रिना रे यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस
वितरण झाले. रोख रक्कम , सन्मान चिन्ह आणि
प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वर्ष 2015 पासून दरवर्षी ‘राष्ट्रीय कला
उत्सवाचे’ आयोजन करण्यात येते.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
0000000
रितेश भुयार
/वृत्त वि. क्र.426/ दिनांक 17.12.2018
No comments:
Post a Comment