Saturday, 15 December 2018

राजधानी दिल्लीत 'शौर्यदिना’चे आयोजन


                                 
नवी दिल्ली दि. 15 : श्री. छत्रपती शिवाजी मेमोरियल नॅशनल कमिटी दिल्ली च्यावतीने येथील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर येथे दिनांक 17 डिसेंबर 2018 रोजी ‘शौर्यदिनाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

            छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रयाहून औरंगजेबाच्या तावडीतून चतुराईने सुटका केल्याच्या घटनेला 351 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य  साधून येथील लोधी रोड स्थित इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये दिनांक 17 डिसेंबर 2018 रोजी सायं. 6 वाजता ‘शौर्यदिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन खासदार अशोक चव्हाण यांचे हस्ते होणार आहे, खासदार मोतीलाल व्होरा अध्यक्ष स्थानी असतील तर संपत कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार कार्याला काव्यांजलीतून अभिवादन करणा-या कवि संमेलनाने होईल . प्रसिध्द कवी डॉ. नरेंद्र मोहन या  कविसंमेलनाचे अध्यक्ष असून ख्यातनाम कवी, शाहीर संभाजी भगत, प्रसिध्द कवी प्रतिभा अहिरे,  गीतकार प्रकाश घोडके यांचा सहभाग असणार आहे.
  
या कार्यक्रमात भोकर विधानसभा मतदारा संघाच्या आमदार अमिता अशोक चव्हाण यांना राष्ट्रनायिका जिजाऊ पुरस्काराने तर अमरावती येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई विजय बोंडे  आणि शेतकरी नेते डॉ. अशोक ढवळे यांना कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.            

   
   महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                   0000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.423/  दिनांक 15.12.2018 

No comments:

Post a Comment