निवडीबद्दल महाराष्ट्र परिचय
केंद्राच्यावतीने सन्मान
नवी
दिल्ली दि. 18 : केंद्र
शासनाच्या अख्त्यारितील अखिल भारतीय राज्य रस्ते परिवहन उपक्रम या संस्थेच्या कार्यकारी संचालकपदी कॅप्टन विनोद वसंत
रत्नपारखी यांची निवड झाली आहे.
तब्बल 25 वर्षा नंतर मराठी माणसाची या पदावर निवड झाली
आहे. कॅप्टन रत्नपारखी यांनी नुकतेच पदभार स्वीकारला व आज त्यांनी महाराष्ट्र
परिचय केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.
अखिल भारतीय राज्य रस्ते परिवहन उपक्रमाच्या संचालक मंडळाची नुकतीच निवड
झाली आहे. देश भरातील सर्वच राज्यांच्या रस्ते परिवहन महामंडळ व उपक्रमांच्या
वरिष्ठ अधिका-यांनी यात भाग घेतला. कार्यकारी संचालक पदी झालेल्या निवडीबद्दल
महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी आज कॅप्टन रत्नपारखी
यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. यावेळी अखिल भारतीय राज्य रस्ते परिवहन
उपक्रम संस्थेचे रस्ते सुरक्षा सल्लागार डॉ. डि.टी.पवार उपस्थित होते.
कॅप्टन रत्नपारखी हे वर्ष 2010 पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या
वाहतूक, नियोजन व पनन या विभागांमध्ये महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मार्च
2018 मध्ये प्रदीर्घ सेवेनंतर कॅप्टन रत्नपारखी हे महाव्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त
झाले आहेत. मेजर विलास थोरात यांची 25 वर्षांपूर्वी अखिल भारतीय राज्य रस्ते परिवहन उपक्रमाच्या कार्यकारी संचालकपदी निवड झाली होती. त्यांच्यानंतर हा बहुमान
कॅप्टन रत्नपारखी यांना मिळाला आहे.
कॅप्टन रत्नपारखी
यांनी भारतीय सैन्याच्या रेजिमेंट ऑफ आर्टिलरीमध्ये कारकिर्दीस सुरुवात केली.
त्यांनी या माध्यमातून ग्वालियर, शरीफाबाद, लेह आणि श्रीनगर या ठिकाणी भारतीय
सैन्यात सेवा दिली होती.
अखिल भारतीय राज्य रस्ते परिवहन उपक्रमाविषयी
अखिल भारतीय राज्य
रस्ते परिवहन उपक्रम ही देशातील सर्व रस्ते महामंडळाला मार्गदर्शन करणारी केंद्रीय
परिवहन मंत्रालयाच्या अख्त्यारितील संस्था
आहे. या संस्थेच्या माध्यमातून रस्ते परिवहनाच्या विकासासाठी शैक्षणिक उपक्रम
राबविण्यात येतात. परदेशांमध्ये रस्ते महामंडळांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नव-नवीन संकल्पनांची माहिती
जाणून घेण्यासाठी या संस्थेच्यावतीने
भारतातील रस्ते महामंडळ व उपक्रमांच्या अधिकाऱ्यांचे दौरे आयोजित करण्यात
येतात. विविध राज्यांच्या रस्ते परिवहन महामंडळांना लागणाऱ्या अवजड वस्तू व यंत्र खरेदी करणे सुलभ जावे म्हणून खरेदीचे दर करार
करणारी, खाजगी भाडेतत्वावरील गाड्यांचे दर करार करणारी महत्वाची संस्था आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
0000000
रितेश भुयार
/वृत्त वि. क्र.427/ दिनांक 18.12.2018
No comments:
Post a Comment