नवी दिल्ली, 31 : महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिक्षक श्रीकांत
भालेराव आणि रोनिओ ऑपरेटर प्रताप सिंह आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून
त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.
श्री. भालेराव
आणि श्री.प्रताप सिंह यांच्या निरोप समारंभाचे आयोजन आज परिचय केंद्रात करण्यात आले.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी
उभय कर्मचा-यांना पुष्प गुच्छ व भेट वस्तू देवून स्वागत केले. कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी
, पत्रकार, कार्यालयाचे निवृत्त अधिकारी -कर्मचारी आणि महाराष्ट्र सदनाचे आजी- माजी
कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
श्री. भालेराव यांनी कार्यालयात विविध पदांवर यशस्वीरित्या जबाबदारी
पार पाडली. याशिवाय केंद्रातील विद्यमान मंत्री श्री. सुरेश प्रभु, माजी मंत्री स्वर्गीय
गुरुदास कामत यांच्या कार्यालयातही श्री. भालेराव यांनी प्रतिनियुक्ती दरम्यान यशस्वीरित्या
जबाबदारी पार पाडली आहे. 36 वर्षांच्या दीर्घ सेवनंतर श्री भालेराव सेवानिवृत्त झाले. शिपाई पदावर बराच काळ कार्यरत
प्रताप सिंह हे रोनिओ ऑपरेटर म्हणून निवृत्त झाले. कामाप्रती समर्पणभाव आणि प्रामाणिकता
यामुळे ते सर्वप्रिय कर्मचारी ठरले. 26 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर श्री प्रताप सिंह
सेवानिवृत्त झाले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत
व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.435/ दिनांक
३१.१२.२०१८
No comments:
Post a Comment