राजपथावर
महाराष्ट्राच्या 'भारत छोडो' चित्ररथाचे शानदार प्रदर्शन
नवी दिल्ली, 26 :
‘वंदेमातरम’ च्या सुरात 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा इतिहास जीवंत करणारा
महाराष्ट्राचा चित्ररथ आज राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरला. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी
एनसीसी व एनएसएस पथकाचे नेतृत्व केले तर डॉ तनुजा नाफडे यांनी भारतीय लष्कारासाठी संगितबध्द
केलेली शंखनाद मार्शलधूनही प्रथमच राजपथावर वाजली यामुळे महाराष्ट्राचा गौरवच देश व
जगाने याची देही याची डोळा बघितला.
भारत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू,
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सेरियल रामफोसा
यांच्या सह अन्य गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत आज राजपथावर 70 वा
प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी शहीद
झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरनार्थ सदैव तेवत राहणा-या इंडियागेटस्थित ‘अमर जवान ज्योतीला’ देशवासीयांच्यावतीने
आदरांजली वाहिली. यानंतर मुख्य मंचावर राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत व त्यासोबतच 21 तोफांची
सलामी देण्यात आली. लांस नायक नसीर वानी यांना अभूतपूर्व शौर्य व बलीदानासाठी
मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पदक ‘अशोक चक्र’ जाहीर झाले, आज या समारंभात नसीर वानी यांच्या पत्नी व आईने हा सन्मान राष्ट्रपतींच्या
हस्ते स्वीकारला.
यावर्षीच्या पथसंचलनात सेनेचे अश्वदल, रनगाडे, ब्रम्होस
मीसाईल, स्वाती रडार, युध्द टँक, आकाश मिसाईल, लष्कर, नौदल आणि वायुदलाचे पथ संचलन
आणि बँड पथकांची आकर्षक पेशकश उपस्थितांचे आकर्षण ठरले.
महाराष्ट्राच्या ‘भारत छोडो’ चित्ररथाने जिंकली मने
देश
प्रेमाणे ओतप्रोत ‘वंदे मातरम…..’ या राष्ट्रगाणाची धून आणि ‘करेंगे या मरेंगे’, ‘भारत छोडो’ अशा घोषणांच्या निनादात ‘भारत छोडो’ आंदोलनावर आधारित
महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून राजपथावर उपस्थितांनी
स्वातंत्र्याची चळवळच अनुभवली.
चित्ररथाच्या
पुढील भागात दृढ निश्चय व करूणामयी स्वभाव दर्शविणारा व भारत छोडोची घोषणा देणारी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मोठी प्रतिमा सर्वांचे आकर्षण ठरले. चित्ररथाच्या
मध्यभागी एकतेचे प्रतिक असणारा 'चरखा' व चित्ररथाच्या शेवटच्या भागात मुंबईची खास ओळख
'गेट वे ऑफ इंडिया' ची प्रतिकृतीही लक्षवेधी ठरले. 'छोडो भारत चळवळी' ची भव्यता
दर्शविणारा जनसागर चित्ररथाच्या दोन्ही बाजुस
विविध म्युरल्सच्या माध्यमातून दर्शविण्यात आला तोही उपस्थितांच्या पसंतीस
उतरला.
चित्ररथावर
कलाकारांनी
घोषणा देणारे स्वातंत्र्य सैनानींची व इंग्रज पोलीस अधिका-यांची भूमिका
साकारल्या . याशिवाय चित्ररथाच्या दोन्ही बाजुला ‘करेंगे
या मरेंग’, ‘भारत छोडो’ अशा घोषणा देणारे एकूण 35 कलाकार
हा भारत छोडो चळवळीचा ऐतिहासिक लढा साकारला
होता.
सागर मुगले ने एनसीसीचे तर दर्पेश डिंगर ने एनएसएस चे नेतृत्व
केले
औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचा कॅडेट सागर मुगले याने राजपथावरील 144 सदस्यीय एनसीसी पथकाचे नेतृत्व करून नवा किर्तीमान स्थापीत
केला. राज्यातील 22 कॅडेटस पथसंचलनात
सहभागी झाले. पुणे येथील सिंहगड इन्स्टिटयूट
ऑफ इंजिनियरींग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर
या विद्यार्थ्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व केले. राज्यातील एनएसएसच्या 14 विद्यार्थी विद्यार्थींनी
या पथसंचलनात सहभाग घेतला.
महाराष्ट्राच्या एंजले देवकुळे व तृप्तराज पंडया यांना उपस्थितांचे
अभिवादन
पथ संचलनात प्रधानमंत्री बाल
पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील एंजेल देवकुळे आणि तृप्तराज पंडयाही पथ संचलनात
सहभागी झाले उपस्थितांनी उभे राहून वटाळयांच्या गजराज या दोघांना अभिवादन केले. क्रीडा
क्षेत्रातील योगदानासाठी एंजल देवकुळे हिला तर कला व संस्कृतिक क्षेत्रातील
कामगिरीसाठी तृप्तराज पंडया यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री
राष्ट्रीय बाल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. एकूण 26 पुरस्कार विजेते बालक यावेळी सहभागी झाले.
महाराष्ट्र कन्येने तयार केलेली मार्शल धून प्रथमच
राजपथावर वाजली
नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयात
संगीताच्या प्राध्यापिका डॉ. नाफडे यांनी भारतीय लष्कारासाठी संगीतबध्द केलेली शंखनाद
ही पहिली ‘मार्शल धून’ आज राजपथावर वाजली. हा ऐतिहासिक क्षणच ठरला असून या प्रजासत्ताक
दिनापासून प्रथमच ‘ब्रिटीश मार्शल धून’ ऐवजी भारतीय ‘मार्शल धून’ वाजण्याची पंरपरा
सुरु झाली आहे.
राजपथावर
महाराष्ट्र
राजपथावर देशाच्या समृध्द सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जते सोबतच
महाराष्ट्राच्या 'भारत छोडो' आंदोलनावरिल आधारित
चित्ररथासह 16 राज्यांचे चित्ररथ तसेच
6 केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांनी
लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या सागर मुगले यांनी एनसीसी पथकाचे तर दर्पेश डिंगर ने एनएसएस पथकाचे नेतृत्व केले.
बाल शक्ती पुरस्कार प्राप्त बालकांच्या पथसंचलनात महाराष्ट्राची एंजेल देवकुळे व
तृप्तराज पंडया यांचा सहभाग वैशिष्टपूर्ण ठरला. शंखनाद ही महाराष्ट्र कन्येने
संगीत बध्द केलेली पहिली मार्शल धून राजपथावर वाजली.
|
भारतीय वायुसेनेच्या फ्लाईंग पास मध्ये हेलीकॉप्टर्स वर
भारतीय तिरंग्यासोबत तीन सेनादलांचे झेंडे आणि आशियान देशांचे झेंडेही फडकताना
दिसून आले.
00000
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.41/दि.26.01.2019
No comments:
Post a Comment