नवी
दिल्ली, दि. 25 : महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील
सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त(अ.का.)समीर सहाय यांनी
उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना ‘राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ’ दिली. सहायक निवासी
आयुक्त सुमन चंद्रा, इशु
संधू, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय
केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा
महाराष्ट्र
परिचय केंद्रात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थित
अधिकारी व कर्मचा-यांना ‘राष्ट्रीय
मतदार दिनाची शपथ’ दिली. महाराष्ट्र
परिचय केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत यावेळी
उपस्थित होते.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.38/दि.25.01.2019
No comments:
Post a Comment