नवी
दिल्ली, २९ : केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात येणा-या पहिल्या मूकनायक पुरस्काराचे वितरण ३१ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.
येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित पुरस्कार
वितरण समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री
नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय
वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभु, सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री
रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, केंद्रीय
अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास
कम्युनिशनचे महासंचालक के.जी.सुरेशही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ३१ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरु केले या घटनेस १०० वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य मंत्रालय आणि डॉ.बाबासाहेबआंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने
पहिला 'मूकनायक पुरस्कार' वितरीत करण्यात येणार आहे. शोषितांच्या व्यथा आणि आवाज
सरकार व जनसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सुरु झालेल्या मूकनायक पाक्षिकाच्या
नावाने देण्यात येणार हा पुरस्कार शतकारनंतरही समाजातील शोषितांचा आवाज आपल्या
लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचे काम करणा-या पत्रकारांना देण्यात येत
आहे.
पुरस्कार व पुरस्काराचे स्वरूप
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रत्येकी
एका पत्रकारास ‘मुकनायक पुरस्कार’ प्रदान
करण्यात येणार आहे. तसेच, या दोन्ही माध्यमातून प्रत्येकी एका पत्रकाराला
प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १ लाख रूपये रोख आणि सन्मानपत्र असे मुख्य पुरस्काराचे तर ५१ हजार रूपये आणि सन्मानपत्र असे
प्रोत्साहन पर पुरस्काराचे स्वरूप आहे.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.46/दि.29.01.2019
No comments:
Post a Comment