नवी
दिल्ली, ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची
आहुती देणा-या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आज महाराष्ट्र
सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कोपर्निकस स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त(अ.का.)समीर सहाय, सहायक निवासी
आयुक्त विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी
उपस्थित होते. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली
महाराष्ट्र परिचय
केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे
, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.48/दि.30.01.2019
No comments:
Post a Comment