नवी दिल्ली, 28 : ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या प्रतिष्ठित पुरस्काराने महाराष्ट्रातील 5 वरिष्ठ अधिका-यांना उपराष्ट्रपती एम.वैकय्या नायडु यांच्या हस्ते गौरवविण्यात आले.
येथील प्रवासी भारतीय केंद्रात “कल्पकता आणि प्रशासन” याविषयावर दिनदयाल संशोधन संस्था आणि युनायटेड नेशन ग्लोबल काम्पेक्टच्यावतीनें ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता उपराष्ट्रपती एम.वैकय्या नायडु यांनी केली. यावेळी देशभरातील विविध विभागातील उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारांना सन्मानित करण्यात आले. यामधे महाराष्ट्रातील 5 वरिष्ठ अधिका-यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग बोर्डाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, महाराष्ट्र शासनाच्या वस्तु व सेवाकर विभागाचे आयुक्त राजीव जलोटा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी . अनबालगन, ठाणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर या पाच वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांना त्यांनी प्रशासनामधे केलेल्या उल्लेखनीय कार्यसाठी यावेळी ‘डॉ. अब्दुल कलाम’ याप्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.86/दि 28.02.2019
No comments:
Post a Comment