नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील
11 पोलीस अधिका-यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर
करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आज 25 राज्य, केंद्रशासित
प्रदेश व केंद्रीय तपास यंत्रणेत कार्यरत असणा-या 101 पोलीस अधिका-यांना गृहमंत्री
पदक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील 11 पोलीसांचा यात समावेश आहे. मध्य प्रदेशातील
11 पोलीस अधिकारी, सीबीआयचे 9 अधिकारी तसेच राजस्थान व उत्तर प्रदेशातील प्रत्येक
7 पोलीस अधिका-यांचा यात समावेश आहे. देशातील 12 महिला पोलीस अधिका-यांनाही
गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रातील खालील पोलीस अधिका-यांना गृहमंत्री पदक
जाहिर झाले आहे.
राज तिलक रोशन ( पोलिस उपायुक्त), दिपक
पुंडलिक देवराज (पोलिस उपायुक्त), सुरज पांडुरंग गुरव (पोलिस उपाधिक्षक), रमेश
नागनाथ चोपडे( सहाय्यक
पोलिस आयुक्त), दिनेश विठ्ठलराव आहेर (पोलिस
निरीक्षक), शशिराज गुंडोपंत पाटोळे ( पोलिस निरीक्षक), चिमाजी
जगन्नाथ आढाव ( पोलिस
निरीक्षक), सुरज जयवंत पडावी ( पोलिस निरीक्षक), सुनिल
किसन धनावडे ( पोलिस
निरीक्षक), सचिन मुरारी कदम (पोलिस निरीक्षक) आणि धनंजय
चित्तरंजन पोरे (सहाय्यक पोलिस निरीक्षक) यांचा समावेश आहे.
00000
दयानंद कांबळे/वि.वृ.क्र.87 /दि 28.02.2019
No comments:
Post a Comment