Tuesday, 19 February 2019

राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार गरजेचे : सुमित्रा महाजन



नवी दिल्ली, 19 :  राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार-विचार वर्तमानातही गरजेचे असल्याचे, प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज येथे केले.
येथील इंदिरा गांधी कला केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव मोठया थाटामाटात करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन सुमित्रा महाजन उपस्थित होत्या. मराठा रेजीमेंटचे लेफ्टनंन जनरल पी.जे.एस. पन्नु,  खासदार  संभाजी छत्रपती यावेळी मंचावर उपस्थित होते. मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अपर्ण केले.
श्रीमती महाजन म्हणाल्या, महाराष्ट्रासह देशाच्या काना-कोपरात शिवाजी महाराज जयंती उत्साहाने साजरी केली जाते. देशाच्या राजधानी होणारा हा सोहळा सर्वांनाच प्रेरणादायी असा आहे. शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व मोठे असून हिंदवी स्वराज्यासाठी दिलेला लढा, केलेले पराक्रम, सुराज्य निर्मीतीसाठी उचलेली पावले हे सदा-सर्वदा सर्वांसाठी आर्दश असेच राहील. त्यांच्या या जयंती निमित्त इतिहासाचा पुनरूच्चार होत असुन देशावर वाईट नजर टाकणा-या दुश्मनांशी लढा देण्यासाठी देशातील सैनिकांसह सर्वच भारतीय सदैव त्तपर राहतील, अशी अपेक्षाही श्रीमती महाजन यांनी व्यक्त केली.
देशभरातील सर्वच सैनिकी तुकडयांचे घोषवाक्य हे देवी-देवतांच्या, महापुरूषांच्या नावाने होत असतो, कारण त्यांच्या शौर्य गाथांनी बळ निर्माण होत असल्याचेही श्रीमती सुमित्रा महाजन यावेळी म्हणाल्या. या देशातील प्रत्येक आईने जिजामातेचा आदर्श घेऊन आपल्या अपत्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराजासारखे  घडवावे, त्यांना सुस्कृंत करावे, देशप्रेम जागृतीवर भर द्यावा, असा संदेशही श्रीमती महाजन यांनी या मंचावरून दिला.
शुरवीर ताराराणी यांचे विस्तारीत चरित्र जगासमोर आणण्याची विनंतीही श्रीमती महाजन यांनी मंचावरून संभाजी छत्रपती यांना केली.  कार्यक्रमामध्ये सादर  झालेले पोवाडे, ताराराणीवर आधारित नाटीका याचे कौतुकही श्रीमती महाजन यांनी याप्रसंगी केले.
मराठा रेजीमेंटची 250 वर्षांची गौरवशाली पंरपरा  : ले. ज. पन्नु
मराठा रेजीमेंटची 250 वर्षांची गौरवशाली पंरपरा असल्याचे सांगुन मराठा रेजीमेंटचे लेफ्टनंन जनरल पी.जे.एस. पन्नु म्हणाले, देशाच्या सरंक्षणार्थ सदैव हे रेजीमेंट त्तपर असते. या रेजीमेंटच्या सैनिकांनी दोन्ही महायुद्धात आपल्या जीवाची पर्वा न करता सहभागी झाले आहेत. त्या काळात व्हिकटोरीया क्रॉस पुरस्कारानेही मराठा रेजीमेंटला गौरविण्यात आलेले आहे. सध्या मराठा रेजीमेंटमध्ये 40 हजार सैनिक आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पुर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत जिथेही देशावर आक्रमण झाले जिथे दुश्मनांशी दोन हात करण्यात मराठा रेजीमेंट सदैव तयार राहते. देशाच्या संरक्षर्णाथ दिले जाणारा सर्वोच्च सन्मान मराठा रेजीमेंटच्या सैनिकांना मिळालेले असून यासह अनेक सन्मानानेही गौरविण्यात आलेले असल्याचे पन्नु यांनी सांगितले.
दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस मराठा रेजीमेंटमध्ये मराठा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. याच दिवशी सिंहगड (कोडांना किल्ला) तानाजी मालुसुरे यांनी जिकंला होता, अशी माहिती देत, शिवाजी महाराजांनी त्या समयी उच्चारलेले उदगार गड आला पण सिंह गेला हे वाक्यही श्री पन्नु यांनी मराठीत उच्चारले.  मराठा रेजीमेंटचे घोष वाक्य मर्द मराठा आम्ही खरेअसे म्हणुन याचा अर्थ  यावेळी समाजावुन सांगितला.
खासदार छत्रपती संभाजी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सांगितले, शिवाजी महाराजांनी 350 वर्षापुर्वी दिलेला लढा, स्वराज्यापासून सुराज्यापर्यंत केलेले यशस्वी प्रयत्न आजच्या पीढीला कळावे, त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मातृभुमीसाठी लढावे यासाठीच हा महोत्सव राजधानीत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे, समाजाचे नसुन त्यांनी 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना आणि मावळयांना घेऊनच सुराज्य स्थापन केले असल्याचे छत्रपती संभाजी यावेळी म्हणाले.
कार्यक्रम सुरू होण्यापुर्वी पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यातील शहीद भारतीय सैनिकांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.

No comments:

Post a Comment