नवी दिल्ली दि. 1: हरित क्रांतीचे प्रणेते तथा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात
साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित
महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी
आयुक्त समीर सहाय यांनी वसंतराव नाईक
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय
कायरकर ,सुमन चंद्रा, अजीतसिंह नेगी
यांच्यासह
महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात वसंतराव नाईक
यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस
पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी
अमरज्यौत कौर अरोरा यांच्यासह कार्यालयात उपस्थित अभ्यागत, अधिकारी व कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१४६ /
दिनांक १.०७.२०१९
No comments:
Post a Comment