नवी दिल्ली, 23 : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी विजय कायरकर, अजितसिंग नेगी, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य टिळक यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
No comments:
Post a Comment