Tuesday, 6 August 2019

उत्तराखंड बस दुर्घटनेत मुंबईतील तीन भाविक जखमी




नवी दिल्ली,दि.6:  उत्तराखंडमधील ब्रदिनाथ तिर्थस्थळाहून परतताना चमोली जिल्हयातील लामबगड येथे  भाविकांच्या बसवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मुंबईतील 3 भाविकांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

            ब्रदिनाथ तिर्थस्थळाहून दर्शन घेवून परत येत असलेल्या  14 भाविकांच्या बसवर आज ब्रदीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील लामबगड येथे  सकाळी 10 वाजताच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत 6 जण मृत झाले असून यापैकी एकाचीच ओळख पटली आहे. ओळख पटलेल्या 20 वर्षीय युवकाचे नाव राजू कुमार असून तो उत्तरप्रदेशातील बिजनोर येथील रहिवासी आहे.

            या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले आहेत. मुंबईतील शैलेंद्र शुक्ला (40 वर्ष), रवि सिंह(27 वर्ष) आणि सुरज मिश्रा (21 वर्ष) हे भाविक या दुर्घटनेत जखमी झाले असून जोशीमठ येथील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

            राज्य मदत व पूनर्वसन विभाग व पोलिसांनी सायंकाळी 7 वाजेपर्यंत शर्तीचे प्रयत्न करून बस मधील 5  मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.  शवविच्छेदन सुरु असून मृतांची ओळख पटलेली नाही.
                 
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१७९ /  दिनांक  .०८.२०१९ 




No comments:

Post a Comment