एम्स रूग्णालयात भेट
नवी दिल्ली, 19 : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर उपचार सुरु असून मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील एम्स रूग्णालयात श्री. जेटली यांच्या प्रकृतीची
विचारपूस केली.
येथील एम्स रुग्णालयात श्री
जेटली यांच्यावर उपचार सुरु असून सोमवारी रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांनी एम्स रूग्णालयात जाऊन श्री. जेटली यांच्या
प्रकृतीची चौकशी केली. श्री. जेटली यांच्या कुटुंबियांसोबत त्यांनी चर्चा केली व प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली आणि
त्यांना धीर दिला.
गेल्या काही दिवसांपासून श्री जेटली यांच्या प्रकृतीत
चढउतार होत आहे. फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे 9 ऑगस्टला सकाळी त्यांना एम्स
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या
मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो
करा . http://twitter.com/MahaGovtMic
000000
रितेश भुयार /वृत्त
वि. क्र.193 / दिनांक 19.08.2019
No comments:
Post a Comment