Tuesday, 20 August 2019

राजधानीत सद्भावना दिन साजरा














नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.
दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. यावेळी श्री सहाय यांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी- कर्मचा-यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली .

                        महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा  
महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्री.कांबळे यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांनी  स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. 
0000
रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.194 / दिनांक  20.08.2019





No comments:

Post a Comment