
नवी दिल्ली, 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी यांनी आज उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू आणि केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्राचे नवनियुक्त
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच उपराष्ट्रपती
यांची ६, मौलाना आझादरोड या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यानंतर त्यांनी नॉर्थब्लॉक येथे केंद्रीय गृहमंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह यांची भेट घेतली.
०००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.217/
दिनांक 17.09.2019

No comments:
Post a Comment