नवी दिल्ली, 26 : महाराष्ट्र
सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील
सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’
सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी गुंतवणूक तथा राजशिष्टाचार
आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय
कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय
केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात ‘संविधान दिन’ साजरा
महाराष्ट्र
परिचय केंद्रात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचा-यांनी ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामुहिकपणे वाचन
केले. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह
महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
रितेश भुयार
/वृत्त वि. क्र. २५८/ दिनांक 26/11/2019
No comments:
Post a Comment