नवी दिल्ली , 03 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. उपस्थित अभ्यागत, अधिकारी व कर्मचा-यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. ०२ / दिनांक 03/01/2020
No comments:
Post a Comment