Thursday, 13 February 2020

‘ऑरगॅनिक फुड फेस्टीवल’मध्ये महाराष्ट्रातील 8 दालने



21 ते 23 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत प्रदर्शन
नवी दिल्ली दि. 13 : जैविक शेती संबंधित उद्योग करणा-या माहिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि माहिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने 21 ते 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑरगॅनिक फुड फेस्टीवल चे आयोजन करण्यात येणार आहे.
हे प्रदर्शन जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे होणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत बादल कौर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये महाराष्ट्रातील 8 दालने राहतील.
 ऑरगॅनिक फुड फेस्टीवल मध्ये एकूण 150 दालने राहतील. यामध्ये सगळयाच राज्यातील जैविक शेती करणा-या माहिला, संबधित उद्योजिका सहभागी होणार असल्याचे श्रीमती कौर यांनी सांगितले. मुख्यत: महिला बचत गट, सहकारी शेतीच्या माध्यमातुन जैविक शेती आणि उद्योग करणा-या माहिलांचा समावेश या प्रदर्शनात राहील.
जैविक शेत जमीन आणि सर्वाधिक जैविक उत्पादन करण्यामध्ये  भारताचा जगात 9 क्रमांक लागतो. यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे श्रीमती कौर म्हणाल्या. भारतात जवळपास 1.70 दशलक्ष मेट्रीक टन प्रामणित जैविक उत्पादन होते. यामध्ये तेलबीया, ऊस, डाळी, बाजरी, तृणधान्य,कापुस,  औषधी वनस्पती, चहा, कॉफी, फळे-भाज्या, मसाले, ड्रॉय फ्रुट, यांचा समोवश आहे .
आंतरराष्ट्रीय स्तरावर जैविक पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता भारतात मोठी संधी  असून या आयोजनाने उत्पादकांचा फायदा होईल, अशी अपेक्षा  श्रीमती कौर यांनी व्यक्त केली. जैविक शेती अधिकाधिक शेतक-यांनी करावी यासाठी पंरपरागत कृषी विकास योजनाकेंद्र सरकारने सुरू केली आहे. यासह महिलांना मुद्रा योजनेच्या माध्यमातुन जैविक शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रीय अन्न प्रकिया उद्योक मंत्रालय आणि माहिला व बाल कल्याण मंत्रालयामध्ये सामंजस्य करार झाला असल्याची माहिती श्रीमती कौर ने यावेळी दिली.  

असे असेल प्रदर्शन
आयोजित प्रदर्शनात जैविक खादय पदार्थ वस्तुची विक्री केली जाणार आहे. सहभागी  महिलांना अत्याधुनिक प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येईल. विक्रेत्यांशी करार, नेटवर्कींग, यशस्वी शेतकरी माहिला-उद्योजिकांचे खास मुलाखत, आहारतज्ञाचे सत्र, सुप्रसिद्ध शेफव्दारे पाककृतीचे प्रात्याक्षिके.  सांस्कृतिक तसेच नक्कुड नाटकही असणार आहे.

No comments:

Post a Comment