Monday, 10 February 2020

पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट






                       
नवी दिल्ली दि. 10 :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली.   

दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या या 22 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी अभ्यास दौ-याच्या समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, सहयोगी प्राध्यापक संदीप नरडेले आणि चैताली गायकवाड यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक  दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

        यावेळी औपचारिक वार्तालापही झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत  दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविद्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. दिल्ली स्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांच्या कार्यालयांचा आपसातील समन्वय याविषयी त्यांनी माहिती दिली. परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार समन्वय कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय, महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयीही त्यांनी माहिती दिली. नव माध्यमांचा वाढता प्रभाव पाहता  शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.

            महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे  तीन भाषेतील अधिकृत व प्रमाणीत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारी शासनाची प्रसिध्दी याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.
            उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याविषयीचे सादरीकरण केले.  
  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.31/  दिनांक  १.०२.२०२० 

No comments:

Post a Comment