Friday, 21 February 2020

महाराष्ट्रात सायबर व क्रिडा विद्यापीठ उभारली जातील : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत










         

नवी दिल्ली दि. 21 :वाढत जाणाऱ्या सायबर घटनांना आळा घालण्यासाठी  राज्यात सायबर विद्यापीठ तसेच पुढील 10-15 वर्षात देशाचे नाव ऑलम्पिकमध्ये चमकावे यासाठी क्रिडा विद्यापीठ लवकरच उभारली जातील, अशी माहिती राज्याचे  उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी आज येथेे  दिली

      एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 10व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात श्री सावंत बोलत होते.
      या सत्राचा विषय "विद्रोह, दहशतवाद नक्षलवादाशी संघर्ष - कारणे आव्हाने”   हा होता. या सत्राची अध्यक्षता  ओडिशाचे विधानसभा अध्यक्ष श्री डॉ.सुजोय पात्रो यांनी केलीया प्रसंगी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खानविधायक सौरभ भारद्वाज, ब्रह्माकुमारी शिवानी बहन, ब्रह्माकुमारी डॉ. बिन्नी सनी डॉ. कौल हे उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव हे उपस्थित होते

      श्री सावंत पुढे म्हणाले, भविष्यात आतंकवाद्याकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्या वाईट घटनांना परिणाम देण्यात येणार आहे त्याचा सामना तरुणांनी करावा यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सायबर विद्यापीठ सुरू करणार असल्याचे श्री सावंत यांनी  संगीतले
.
      यासोबतच राज्यात उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत यासाठीही क्रिडा विद्यापीठ सुरू केले जाईल असे श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.  श्री सावंत पुढे  म्हणाले, विद्यार्थी देशेत दिले जाणारे संस्कार हे आयुष्यभर सोबत असतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये  राष्ट्रगान गाण्याचा निर्णय घेतलेला आहे.  राज्यात 20 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी रोज राष्ट्रगाने गातात. युवकांना चांगल्या मार्गावर नेण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालय अल्कोहोलरहित रॅगिं रहीत करण्यासाठी सरकारने पाऊले उचलेली आहेत. देशातील प्रत्येक मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही श्री सावंत म्हणाले.

एमआयटीने सुरू केलेल्या या छात्र संसदेला राज्य शासनाचा पाठींबा असल्याचे सांगुन पुढील वर्षापासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये असा उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासन सहाकार्य करणार असल्याची ग्वाही श्री सावंत यांनी यावेळी दिली.

यावेळी उदय सावंत यांना ‘आदर्श युवा आमदार सन्मान’ ने गौरविण्यात आले.  मणिपूरचे आमदार के. लिसिया, दिल्ली चे  सौरभ भारद्वाज, यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

               आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                       00000
अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.37/दि.21.02.2020


--

No comments:

Post a Comment