दिल्ली दि. 21 : महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये शैक्षणिक
देवाण-घेवाणे होणार असल्याची माहिती राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय
सामंते यांनी आज दिली.
येथील दिल्ली सचिवालयात श्री सामंत यांनी आज दिल्लीचे
उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली.
या भेटीनंतर पत्रकारांना दिलेल्या
माहितीत श्री सामंत म्हणाले, दिल्ली शासनाने शौक्षणिक अभ्यासक्रमात काही उत्कृष्ट
उपक्रम राबविलेले आहेत. त्यांचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होत आहे. याच
पद्धतीचा सकारात्मक परिणाम राज्यातील विद्यार्थ्यांवरही व्हावा याबाबत आज चर्चा
झाली. परदेशातील शैक्षणिक संस्थासोबत सामज्यंस करार केले जातात त्याच धर्ती इतर
राज्यातील उत्कृष्ट उपक्रमाबाबतही करार व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य प्रयत्नशील
असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले.
अन्य राज्यातही शैक्षणिक काही चांगले उपक्रम
राबविले असल्यास त्याचीही माहिती घेतली जाईल, असेही श्री सामंत म्हणाले. पुढील
काळात राज्यातील शिक्षणविभागाचो चमु दिल्ली शासनाला भेटून शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दलची
संपूर्ण माहिती घेईल. यासह श्री सिसोदिया हे ही राज्यात येऊन राज्यातील शैक्षणिक
पद्धती जाणुन घेतील, असल्याचे श्री सामंत यांनी सांगितले.
00000
अंजु
निमसरकर/वि.वृ.क्र.38/दि.21.02.2020
No comments:
Post a Comment