नवी
दिल्ली, 26 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे
आज ‘संविधान दिन’
साजरा करण्यात आला.
कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात ‘राज्य
घटनेच्या उद्देशिकेचे’ सामुहिकपणे
वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, राजशिष्टाचार
तथा गुंतवणूक आयुक्त निधी पांडे, यांच्यासह महाराष्ट्र
सदनाचे अधिकारी-कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘संविधान
दिन’ साजरा
महाराष्ट्र
परिचय केंद्रात‘संविधान
दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी
परिचय केंद्राच्या अधिकारी कर्मचा-यांनी ‘राज्य
घटनेच्या उददेशिकेचे’
सामुहिकपणे वाचन केले. यावेळी दयानंद कांबळे उपसंचालक (माहिती), माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह परिचय केंद्राचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment