Tuesday, 30 March 2021

‘महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन’ या विषयावर डॉ.गणेश चंदनशिवे यांचे व्याख्यान



नवी दिल्ली, दि. 30  : प्रसिध्द लोककलावंत तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे  विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे हे महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत उद्या ३१ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन या विषयावर १३ वे पुष्प गुंफणार आहेत.  

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालाआयोजित करण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी या व्याख्यानमालेच्या तेराव्या दिवशी डॉ. गणेश चंदनशिवे  दुपारी ४.०० वाजता महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन या विषयावर विचार मांडणार आहेत.  

                                  डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या विषयी 

          डॉ. चंदनशिवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बी.ए च्या पदवीसह नाटय विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मधून त्यांनी मराठी लोकनाटय तमाशा या विषयात पीएचडी मिळविली आहे. २००३ ते २००५ दरम्यान त्यांनी  जळगाव आणि धुळे येथील महाविद्यालयांमध्ये अध्यापनकार्य केले. २००६ पासून डॉ. चंदनशिवे हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये अध्यापनाचे कार्य करीत असून सद्या या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. डॉ. चंदनशिवे यांनी  विविध परिषदांमध्ये लोककला विषयांवर १५ रिसर्च पेपर सादर केली आहेत.

            गेल्या १० वर्षांपासून त्यांनी मराठी व हिंदी नाटकांमध्ये तसेच रियालिटी शो मध्ये अभिनय व दिग्दर्शन केले आहे. मध्यप्रदेशातील सागर येथील हरिसिंह गौर नाटय विभाग आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या नाटय विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. विविध वृत्त वाहिन्या, केंद्रशासनाच्या संस्थांच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांचा सहभाग  राहिला आहे. विच्छा माझी पुरी करा’, गाढवाचे लग्न आदी ८ लोक नाटयामध्ये त्यांनी भूमिका वठविल्या आहेत. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

                                              बुधवारी समाज माध्यमांहून  व्याख्यान प्रसारण  

 

         बुधवार 31 मार्च 2021 रोजी  सायंकाळी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

   आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :  https://twitter.com/MahaGovtMic

                                                         ००००

‍िरितेश भुयार  /वृत्त वि. क्र.७२ /दिनांक  ३०.०३.२०२१

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment