नवी दिल्ली, दि. २९ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळ नवी दिल्लीच्या वृत्त विभागाचे प्रमुख अनंत बागाईतकर हे उद्या ३० मार्च २०२१ रोजी ‘ दिल्लीतील मराठी पत्रकारिता’या विषयावर बारावे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्षआणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’आयोजित करण्यात आली आहे. ३० मार्च रोजी या व्याख्यानमालेच्या बाराव्या दिवशी अनंत बागाईतकर हे दुपारी ४ वाजता विचार मांडणार आहेत.
श्री बागाईतकर हे गेल्या ४० वर्षांपासून सक्रीय
पत्रकारितेत आहेत. पत्रकारितेची पदवी संपादन करून पुण्यातील ‘दैनिक
केसरी’ वृत्तपत्रातून डिसेंबर १९७९ मध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. १९८६ मध्ये ‘दैनिक केसरी’चे
दिल्ली विशेष प्रतिनिधी मधून त्यांनी कार्याला सुरुवात १९८९-९४ दरम्यान
त्यांनी ‘जन्मभूमी’ या
गुजराती वृत्तपत्र समुहासाठी दिल्ली विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे. १९९४ पासून त्यांनी दैनिक सकाळच्या दिल्ली ब्युरो
कार्यालयात विशेष प्रतिनिधी म्हणून कार्याला सुरुवात केली ते आजतागायत या कार्यालयात
कार्यरत असून गेल्या १० वर्षांपासून वृत्तविभाग प्रमुख म्हणून
जबाबदारी सांभाळत आहेत. ‘माध्यमे
आणि राजसत्ता’ ही त्यांची पुस्तिका प्रकाशित
आहे.
दिल्ली आकाशवाणी, लोकसभा टिव्ही, राज्यसभा
टिव्ही, एनडी टिव्ही आदींवर राजकीय
विश्लेषक म्हणून त्यांचा सहभाग असतो. वर्ष
२०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुककाळात त्यांनी
दिल्ली आकाशवाणीवरून या निवडणुकांचे विश्लेषण केले आहे.
त्यांनी २०१८-१९ मध्ये प्रेस क्लब ऑफ इंडिया या पत्रकारितेतील नामांकीत
संस्थेचे अध्यक्ष तर २०१९-२० मध्ये सेक्रेटरी जनरल पद भूषविले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या माध्यम सल्लागार समितीवरही त्यांनी
विविध पदांवर कार्य केले आहे. माजी
लोकसभा अध्यक्ष दिवंगत सोमनाथ चटर्जी यांच्या कार्यकाळात त्यांनी या समितीचे
उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. श्री
बागाईतकर हे सध्या राज्यसभेच्या माध्यम सल्लागार समितीचे सचिव म्हणून जबाबदारी
सांभाळत आहे.
मंगळवार, 30 मार्च 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून
व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे
आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता
येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया
ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता
येणार आहे.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :https://twitter.com/MahaGovtMic
००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.७०/दिनांक २९.०३.२०२१
No comments:
Post a Comment