नवी दिल्ली दि. २८ :  थोर क्रांतिकारक
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 
यांची  जयंती आज  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात
साजरी करण्यात आली.  
कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
 महाराष्ट्र परिचय केंद्रात
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन  
            महाराष्ट्र
परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या जनसंपर्क
अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांच्यासह
कार्यालयातील उपस्थित कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली
वाहिली.  
                                                          000000  
 



 
 
No comments:
Post a Comment