Friday, 30 September 2022

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

दिल्ली, दि.30 : ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध श्रेणीत मराठी चित्रपटांना ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’ ने गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज 68 वा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आशा पारेख यांच्या विषयी

आशा पारेख एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता आहेत. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. या काळात त्यांना 'हिट गर्ल' म्हणून संबोधले जात होते. चित्रपटसृष्टीत त्यांची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली. अभिनेत्री म्हणून सुमारे 95 चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. यामध्ये कटी पतंग, मै तुलसी तेरे आंगन की, दो बदन, मेरा गाँव मेरा देश, दिल देके देखो, आये दिन बहार के, आया सावन झुमके, तिसरी मंजिल, काँरवा अशा विविध चित्रपटांचा समावेश आहे. श्रीमती पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले.

श्रीमती पारेख यांनी त्यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मागील 60 वर्षांपासून सिनेक्षेत्रात काम करीत असून आजही आपण या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगीतले.

सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार तानाजी : द अनसंग वॉरिअर या चित्रपटास देण्यात आला. याची निर्मिती अजय देवगण फिल्मस् आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केली असून दोघांनी सुवर्ण कमळ आणि दोन लाख रूपये रोख रकमेचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

अजय देवगण आणि तामिळ अभिनेता सुर्या (चित्रपट - सोराराई पोट्रु) यांना संयुक्तरित्या उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार रुपये असे आहे.

तानाजी या चित्रपटाला उत्कृष्ट वेशभूषेसाठीही पुरस्कार जाहिर झाला होता. वेशभुषाकार नचिकेत बर्वे आणि महेश र्शेला यांना रजत कमळ ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर निर्मित ‘तुलसीदास ज्युनिअर’ या चित्रपटास सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फनरल या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयाच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार

          महिला व बालकांच्या सक्षमीकरणावर आधारित तसेच अनिष्ट चालीरीतींवर बोट ठेवणारा फनरल या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते बीफोर - आफ्टर एंटरटेन्मेट व दिग्दर्शक विवेक दुबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रुपये, रजत कमळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.       

टकटक आणि सुमी  चित्रपटातील बाल कलाकार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

 टकटक आणि सुमी या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर झाला होता. सुमी सिनेमातील आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या बालकांना तर  टकटक या सिनेमासाठी अनिष मंगेश गोसावी यांना  रजत कमळ  प्रदान करण्यात आले.

सुमी’ ठरला उत्कृष्ट बाल चित्रपट

 सुमी या चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती हर्षला कामत एंटरटेन्मेंट यांनी केली आहे, तर दिग्दर्शक अमोल गोळे यांनी केलेले आहे. या दोघांनाही  सुवर्ण कमळ आणि प्रत्येकी 1 लाख 50 हजार रोख राशी देवून सन्मानित करण्यात आले.

तीन मराठी चित्रपटांना विशेष परीक्षक पुरस्कार प्रदान

विशेष परीक्षक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या 'जून', 'गोदाकाठ' आणि 'अवांछित' या तीन पुरस्कारांनाही गौरविण्यात आले. जून चित्रपटासाठी सिद्धार्थ मेनन यांना  तर ‘गोदाकाठ’ व ‘अवांछित’ या दोन्ही चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

          मी वसंतराव या मराठी चित्रपटातील शास्त्रीय पार्श्वगायनासाठी  राहूल देशपांडे यांना रजत कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. तसेच, या चित्रपटाला उत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कारही जाहिर झाला होता. चित्रपटाचे साऊंड डिझायनर अनमोल भावे यांना रजत कमळ आणि 50 हजार रु. रोख रकमेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदी सिनेमा सायनातील गीतासाठी गीतकार मनोज मुंतशिर यांना रजत कमळ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नॉन फिचर फिल्म श्रेणीत मराठी कुंकुमार्चन चित्रपटाला पुरस्कार प्रदान

           कौटुंबिक मुल्यांवर आधारित कुंकुमार्चन (देवींची पूजा अर्चना) या मराठी चित्रपटाला उत्कृष्ट कौटुंबिक मूल्यांचा पुरस्कार जाहीर झाला होता. या चित्रपटाची निर्मिती स्टुडिओ फिल्मी माँक्स आणि दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी केलेली आहे. या दोघांनाही प्रत्येकी 50 हजार रूपयांचा रजत कमळ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पराया या मराठी/हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक विशेष अय्यर यांना प्रदान करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती एमआईटी स्कूल ऑफ फिल्म ॲण्ड टेलिविजन, पुणे यांची आहे. हा पुरस्कार एमआईटी स्कूल ऑफ फिल्म ॲण्ड टेलिविजनचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी स्वीकारला.

Thursday, 29 September 2022

उषा मंगेशकर और पं. हरिप्रसाद चौरसिया का लता मंगेशकर पुरस्कार से सम्मान

        भारतरत्न लता मंगेशकर अंतर्राष्ट्रीय संगीत महाविद्यालय  का उद्घाटन

लतादीदी के नाम पर अंतर्राष्ट्रीय संगीत महाविद्यालय  से संगीत साधना का कार्य जोर-शोर से शुरू होगा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नई दिल्ली , २९ : मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे ने बुधवार को विश्वास व्यक्त किया कि लतादीदी के नाम पर अंतर्राष्ट्रीय संगीत महाविद्यालय का उद्घाटन एक ऐतिहासिक और भाग्यशाली क्षण है और इस अंतर्राष्ट्रीय संगीत महाविद्यालय से संगीत साधना का कार्य जोर-शोर से शुरू किया जाएगा .

         स्व. भारतरत्न लता मंगेशकर के जन्मदिन पर मुंबई के रविंद्र नाटय गृह में आयोजित विशेष समारोह में महाराष्ट्र सरकार के लता मंगेशकर पुरस्कार वितरण तथा भारतरत्न लता मंगेशकर अंतर्राष्ट्रीय संगीत महाविद्यालय के उद्घाटन समारोह में मुख्यमंत्री  श्री.शिंदे बोल रहे थे.  

               हर साल महाराष्ट्र सरकार के सांस्कृतिक निदेशालय के माध्यम से गायन और संगीत  क्षेत्र में अतुलनीय प्रदर्शन करने वाले वरिष्ठ कलाकारों को गणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार से सम्मानित किया जाता है. इस विशेष समारोह में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विख्यात गायिका उषा मंगेशकर को वर्ष 2020 का लता मंगेशकर पुरस्कार और वर्ष 2021 का पुरस्कार विश्वविख्यात  बासुरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया को प्रदान किया.

               सांस्कृतिक मामलों के मंत्री सुधीर मुनगंटीवार,राजस्व मंत्री राधाकृष्ण विखे-पाटिल, उच्च एवं तकनीकी शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटिल, उद्योग मंत्री उदय सामंत, स्कूल शिक्षा मंत्री दीपक केसरकर, विधायक सदा सरवणकर, विधायक आशीष शेलार, वरिष्ठ संगीतकार अशोक पत्की, मीनाताई खाडीलकर, पद्मश्री. सोनू निगम, आदिनाथ मंगेशकर, संगीतकार मयूरेश पाई, वरिष्ठ गायक अनूप जलोटा, पंकज उदास,रूपकुमार राठौड़, सांस्कृतिक मंत्रालय के सचिव सौरभ विजय  इस अवसर पर उपस्थित थे.

                       लता मंगेशकर अंतर्राष्ट्रीय संगीत महाविद्यालय का उद्घाटन

          भारतरत्न लता मंगेशकर अंतर्राष्ट्रीय संगीत महाविद्यालय का उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया. इस अवसर पर गणमान्य व्यक्तियों द्वारा अंतर्राष्ट्रीय संगीत महाविद्यालय के प्रतीक चिन्ह का अनावरण किया गया.

             इस अवसर पर मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि लतादीदी भले ही आज हमारे बीच नहीं हैं, लेकिन उनकी आवाज आज भी हमारे दिलों में है, मराठी मिट्टी में पैदा हुआ यह रत्न पुरे भारतदेश का हो गया. उन्होंने स्वरमाता को यह कहते हुए सलाम किया कि उनकी आवाज सुने बिना एक भी दिन नहीं गुजरता क्योंकि वह लाखों प्रशंसकों के दिलों में एक दंतकथा बन कर रह गयी  हैं. लतादीदी के नाम से दिए जाने वाले पुरस्कारों का आज वितरण हुआ. इस पुरस्कार के साथ हमने इसके लिए कई कदम उठाए, पिछली कैबिनेट मीटिंग में ही हमने इस संदर्भ में फैसला लिया था. मुख्यमंत्री ने इस अवसर पर घोषणा की कि इस महाविद्यालय के लिए पु.ल. देशपांडे कला अकादमी की जमीन अस्थायी रूप से उपलब्ध करायी गयी है. वैसे ही कलिना में पुस्तक निदेशालय की 7 हजार वर्ग मीटर जमीन कला निदेशक को सौंपी जा रही है.

                 प्रख्यात गायिका उषाताई और विश्वविख्यात बासुरी वादक हरिप्रसाद चौरसिया, जिन्हें  पिछले दो सालों के पुरस्कारों से सम्मानित किया जा रहा है, ये वे दो नाम हैं जो नमन करने योग्य हैं. वह अपने नाम और अनुठे  कार्य से प्रशंसकों  के दिलों पर राज कर चुके हैं और अब भी कर रहे हैं. मुख्यमंत्री शिंदे ने इन दोनों महान कलाकारों को बधाई देते हूए उनकी प्रशंसा में कहें.

                   उषाताई न केवल हिंदी और मराठी गीत नही गाए है बल्कि, अलग-अलग प्रांतों की अलग-अलग भाषाओं के गीत गाकर उन्होंने सही मायने में 'भारत को जोड़ा'. पंडित हरिप्रसाद चौरसिया की बासुरी ने पुरी दुनिया को मंत्रमुग्ध कर दिया. उनकी बासुरी की आवाज न केवल उन्हें बल्कि पुरे भारत में जानी जाती है। उनकी बासुरी  में देश की सीमाओं को तोड़ने की शक्ति है और नई चीजें सीखने का उनका दृढ़ संकल्प काबिले तारीफ है।

 मुख्यमंत्री ने यह भी आश्वासन दिया कि इस महाविद्यालय के उत्थान के लिए वे कोई कसर नहीं छोड़ेंगे ताकि दुनिया हमारे महाराष्ट्र के कलाकार की सराहना और सम्मान दिखाए.

हमारे ट्वीटर हँडल को फॉलो करे : http://twitter.com/MahaMicHindi

                                 ००००००                                     

    फोटो संलग्न है.                                       

Wednesday, 28 September 2022

SMT TO BE TRANSFORMED CSMT to be transformed under Redevelopment Plan Government of India approves 10,000 Cr for 3 Station

C

New Delhi, 28 : The Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Station, Mumbai will be transformed as the Union Cabinet approves a proposal for redevelopment of 3 major Stations including CSMT with an total investment of Rs. 10,000 crores .

            Today’s Cabinet decision will give a new direction to the station development. Work on 199 station is going on and tender have been issued for 47 stations. Work is under progress for 32 stations, says the PIB press release. It also mentions an approximation total investment of nearly 10,000 cr will be involved to give redeveloped look to 3 station- CSMT, New Delhi and Ahmedabad .

Redeveloped Look of CSMT

The standard elements of station design will include a spacious roof plaza with all passenger amenities under one roof-retail, cafeterias, and recreational facilities.

            Facilities like food court, waiting lounge, play area for children and sale of local products will be include. To make a passenger comfortable, provisions like proper illumination, way finding, signages, acoustics, lifts and escalators will be made. The station will be integrated with metro, bus. Green Building techniques will be solar energy, water conservation and improve tree cover.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासकार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 28 : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह एकूण तीन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासकार्यासाठी 10 हजार कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससहित नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास मंजुरी देण्यात आली आहे. या पुनर्विकास कार्यासाठी 10 हजार कोटींच्या निधीलाही मंजुरी देण्यात आल्याचे पत्र सूचना कार्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. देशातील एकूण 199 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून या दिशेने टप्प्या-टप्प्याने कार्य सुरु आहे. यातील 47 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यासाठी निविदा मागविण्यात आल्याअसून 32 रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास कार्य प्रगतीवर आहे.

रेल्वेस्थानक पुनर्विकास कार्यांतर्गत रेल्वे स्थानकावर खाद्य व वस्तू विक्रेत्यांसाठीची जागा, कॅफ्रेटेरिया, मनोरजंन सुविधांसह प्रवाशांना बसण्याची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत. फुड कोर्ट, प्रतिक्षालय, मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक वस्तूंच्या खरेदीची जागा, सीटी सेंटर उभारणे आदी बाबींचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
वृ.क्र/ 154 /28-09-2022

Tuesday, 27 September 2022

महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या  क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 27 : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून  सर्वोत्कृष्ट राज्याचा       दुस-या क्रमांकाचा पुरस्कार आज राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण 9 पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2018-19 चे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री अजय भट, केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंह, अतिरीक्त सचिव राकेश वर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.

  या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रमुख 11 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित पुरस्कारांचे वितरण केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्राला सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वकष पर्यटन विकासाचा व्दितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने हा पुरस्कार  स्वीकारला.

पर्यटन क्षेत्रातील विविध सेवा सुविधा पुरविणा-या शासकीय संस्थांसोबतच खाजगी सेवा पुरविणा-या संस्थांनाही  राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये ही महाराष्ट्राने मोहर उमटव‍िली आहे.

 पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगर पर‍िषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पाचगणी चे मुख्यकार्यकारी अधिकारी गिरीष दापकेकर यांनी स्वीकारला.

मुंबईतील ताजमहाल पॅलेस या पंचतारांकीत  डिलक्स हॉटेलला पंचतारांकीत हॉटेल श्रेणीतील चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पश्चिम विभागातील उत्कृष्ट निरोगता (वेलनेस) केंद्र या श्रेणीतील पुरस्कार पुण्यातील आत्मंतन वेलनेस, मुळशी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला.

ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या श्रेणीतील  पुरस्कार चंदन भडसावळे यांना सगुनाबाग (नेरळ) येथे सुरू केलेल्या ग्रामीण पर्यटन केंद्राला प्रदान करण्यात आला.

 द वेस्टर्न रूट्स या ट्रॅव्हल कंपनीला जबाबदार पर्यटन प्रकल्पातंर्गत उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार श्री. परांजपे यांनी स्वीकारला.

पर्यटक वाहतूक परीचालक श्रेणी -2 मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबईतील गीती ट्रॅव्हल्स यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मनमाहेन गोयल यांनी स्वीकारला. 

पर्यटक परिवहन संचालक श्रेणी-1 मधील व्द‍ितीय क्रमांचा पुरस्कार ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस मर्यादित ला प्रदान करण्यात आला.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाव्दारे परवाना प्राप्त अतुल्य भारत बेड एंड ब्रेकफास्ट (गोल्डन आणि सिल्वर) या श्रेणीतंर्गत पाचगणी येथील डाला रूस्टर, होमस्टे ला उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल  पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कॅप्टन विकास गोखले आणि श्रीमती गोखले यांनी स्वीकारला.

सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा  पुरस्कार स्वीकारल्यानंतर  सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर म्हणाले, या पुरस्काराने आम्हाला आगामी काळात पर्यटन विकासाच्या कार्यास प्रेरणा व उर्जा मिळणार. वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे, वाहतूकीचे विकसित जाळे, निवासाच्या दर्जेदार सुविधा आणि अनुभवजन्य पर्यटनाच्या आधारावर आगामी काळात औद्योगिक क्षेत्रातील आघाडी प्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर राहील. शाश्वत पर्यटन, सुरक्षित पर्यटन व अनुभवजन्य पर्यटन या त्रिसूत्रीवर आधारीत पर्यटन विकासाचे मॉडेल आगामी काळात महाराष्ट्रात उभारले जाईल, अशी प्रतिक्रीया श्री सावळकर यांनी दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
  http://twitter.com/micnewdelhi    

अंजु निमसरकर/ वृ.क्रमांक 152 /27-09-2022