नवी दिल्ली दि. 14 : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, सहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात पं. नेहरू यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
मपकेंनदि/वृत विशेष क्र. 173 दि. 14.11.2022
No comments:
Post a Comment