Thursday, 29 December 2022

‘साहिबजादे’ यांना महाराष्ट्राचा मानाचा सलाम

 




महाराष्ट्र आणि पंजाब यांचे शतकांचे नातं आहे. हे नातं आत्मतीयेचे आहे. आंतरीक असे हे नातं आहे. संत नामदेव भारत भ्रमण करीत असताना पंजाबच्या घुमानमध्ये पोहोचले आणि तिथलेच झालेत. त्यांच्या वाणीत, कर्तृत्वात ऐवढे बळ होते. त्यांच्या अभंगांचा अंर्तभाव गुरू ग्रंथ साहेब मध्ये आहे. दशमेश (दहावे)गुरू गुरू गोविंदसिंग यांना ही महाराष्ट्रात यावेसे वाटले. नांदेडमध्ये त्यांच्या नावे सचखंड श्री हजूर साहेब असे शीख अनुयायांचे महत्वाचे तीर्थस्थळ आहे. हा काही योगायोग नसावा. अस व्हायचं असेल. म्हणूनच ते झालं.

महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये असणारे साधर्म्य हे अनेक विषयात दिसून येते. स्वातंत्र्य पूर्व काळात महाराष्ट्र आणि पंजाब यांनी कित्येक क्रांत‍िकारांना जन्म दिला. देशाचे नेतृत्व केले. भगतसिंगासोबत हसत हसत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचे.  महाराष्ट्र आणि पंजाब चे ऋणानुबंध  किती विशेष आहे. दोन्ही राज्यातील बहुसंख्य जनता ही कृषीनिगडीत व्यवस्थेवर आधार‍ित आहे. पंजाब रेंजीमेंट आणि मराठा रेजीमेंटच्या शौर्य गाथा आपण ऐकतच मोठे झालेलो आहोत. देशाच्या मातीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महाराष्ट्र आणि पंजाब हे शौर्य आणि धाडस, आणि अध्यात्माची पंरपरा जोपसाणारे राज्य आहेत.

 

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये  साहसाचे बाळकडू त्यांना घरूनच पाजले जाते.  माता गुजरी आणि गुरू तेगबहादूर यांच्याकडून अदम्य साहसाचे संस्कार गुरू गोविंदसिंग यांना मिळाले आणि पूढे हाच वारसा त्यांच्या साहिबजादेबाबा अजीत सिंग, बाबा जुझार सिंग तसेच छोटया साहिबजादे साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांना मिळाला. अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद त्यासाठी शेवटपर्यंत निसंकोचपणे शौर्याने उभे राहणे या साहिबजादयांचे आचरण ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ अशीच आहे. त्यांना 26 डिसेंबर ला हौतात्म आले.

 

त्यांच्या या दिवसाला वीर बाल दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचा गुरू गोविंदसिंगशी असलेले नातं बघता या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नवी दिल्ली येथे आयोजित उपक्रमास मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये येथे आंमत्रित करण्यात आले. 

  या ऐतिहास‍िक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले संबोधन उपस्थितांच्या  ह्दयात भ‍िडले असल्याच्या भावना उपस्थितांच्या चेह-यावर दिसत होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या समागमनातील उपस्थिती आणि संबोधनामुळे पंजाब आणि महाराष्ट्राच्या नात्यात नव्याने दृढता निर्माण होईल.

 

अवघ्या 9 वर्ष आणि 6 वर्षांचे वय असणारे छोटे साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांनी अदम्य शौर्याचे परिचय देऊन आपले प्राण अर्पण करून स्वाभ‍िमानीपणाने शहादत दिली. त्यांच्यामध्ये गुरू गोविंदसिंग यांचे रक्त असल्यामुळे या साहबजादे यांनी अदम्य धाडस दाखविले. त्यांच्या या धाडसाला महाराष्ट्राच्या जनतेचा सलाम.

 

 

00000

 

अंजु निमसरकर

माहिती अधिकारी

Wednesday, 28 December 2022

महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान

 









मराठी, संस्कृत आणि ऊर्दु भाषेसाठी पुरस्कार 

नवी दिल्ली,  28 : महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना क्रमश: मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीचा प्रतष्ठित युवा साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

येथील कमानी सभागृहात मंगळवारी  युवा साहित्यिक पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य अकादमी चे उपाध्यक्ष माधव कौशिक आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्य‍िक ममता कालिया उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण 24 भाषेसाठी युवा साहित्यिकांना वर्ष 2022 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांचा समावेश आहे.

 

मराठी भाषेसाठी युवा साहित्य‍िक पवन नालट यांना मी संदर्भ पोखरतोय या काव्य संग्रहासाठी युवा साहित्य साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या साहित्यकृतीत मी संदर्भ पोखरतोय या शिर्षकातूनच बऱ्याच गोष्टी व्यक्त होत असल्याचे श्री नालट म्हणाले.  मी म्हणजे सामान्य माणू, मी चा संदर्भ समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक या सर्व घटकांमध्ये जे अनिष्ट आहे त्याला पोखण्याचे काम हा सामान्य माणुस करू शकतो. अशा आशायाच्या कविता या काव्य संग्रहात असल्‍याचे श्री नालट म्हणाले.

श्री नालट हे मुळचे अमरावतीचे असून ते  शिक्षक आहेत. त्यांच्या याच कविता संग्रहाला के.बी. निकुंब काव्यसंग्रह पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार तसेच डॉ. किसनराव पाटील वाड:मय  पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

 

श्रीमतीचरित्रम् या संस्कृत काव्य संग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना पुरस्कार

मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील श्रीमतीचरित्रम् या काव्यसंग्रहासाठी युवा साहित्य साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राधा-कृष्ण प्रेम हे सर्व परिचित आहे. कृष्णाबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र, राधाबद्दल कमी लोकांना माहिती असल्याचे श्रुती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, राधा या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्य संग्रहात करण्यात आलेला आहे. हे काव्य सात विभागात आहे.  प्रत्येक भागाला लीला असे नाव देण्यात आलेले आहे. यात प्रेम भक्ती व्यक्त करण्यात आलेली आहे. 

 

श्रुती कानिटकर या  आयआयटी मुंबईत  सहायक प्राध्यापक आहेत.  त्या वेदांतमध्ये पी.एच.डी करीत आहेत.  श्रुती यांनी वयाच्या 11 वर्षापासून लेखनाला सुरूवात केली. त्यांच्या श्रीमतीचरित्रम् (कविता संग्रह), सुभाषित  रत्नभांडागारम् (मराठीतील अनुवादाला)  श्रीपाद सेवा मंडळ काव्य लेखन स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे. 

 

गिरयाह ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना युवा साहित्यचा पुरस्कार

 

गिरयाह ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना वर्ष 2022 चा युवा साहित्य साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या ग़ज़ल संग्रह  सामाजिक संबंध, मानवीय मूल्य,  श्रम आणि आधुनिक दुनियेतील भ्रम यावर आधारित आहे. हा संग्रह पारंपरिक आणि आधुनिक ग़ज़लांचे संयोजन आहे. जीवनातील चढ उतार ग़ज़लांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेले आहेत. 

मुंबईचे मकसूद आफ़क़ हे शिक्षक आहेत. त्यांनी ऐतबार आणि गिरयाह हे दोन ग़ज़ल संग्रह आहेत. त्यांनी वेब सीरीज साठी गीत लिहीले आहेत.  त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या पुरस्काराने ही सन्मानित करण्‍यात आलेले आहे.

 

 

Tuesday, 27 December 2022

राजधानीत डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी

 

                 





                      

नवी दिल्ली,  27 : कृषी  क्रांत‍िचे प्रणेते आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

           

कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निधी पांडे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

               

                  महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक(मा.)(अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  याप्रसंगी माहिती अधिकारी  अंजु निमसरकर, यांच्यासह कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Monday, 26 December 2022

'वीर बाल दिवस' के इतिहास से युवा पीढ़ी शौर्य, देशभक्ति और त्याग की प्रेरणा मिलेगी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



ऐतिहासिक कार्यक्रम  में  प्रधानमंत्री के साथ  मुख्यमंत्री शामिल

 

नई दिल्ली 26: 'वीर बाल दिवस' का इतिहास देश के युवाओं में वीरता, देशभक्ति और त्याग की प्रेरणा देगा, ऐसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज यहां अपनी भावना व्यक्त करते हुए कहा.   केंद्रीय संस्कृति मंत्रालय की ओर से दिल्ली के मेजर ध्यानचंद नेशनल स्टेडियम में ऐतिहासिक 'वीर बाल दिवस' कार्यक्रम का आयोजन किया गया.  इस अवसर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री शिंदे, पंजाब के मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, केंद्रीय पेट्रोलियम और प्राकृतिक गैस और आवास शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय संस्कृति राज्य मंत्री अर्जुन मेघवाल, मीनाक्षी लेखी और अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे. मुख्यमंत्री इस कार्यक्रम में बोल रहे थे.

 

मुख्यमंत्री ने आगे कहा, वीर बाल दिवस जैसे सर्वोच्च त्याग के यादगार समारोह का आयोजन  निश्चित रूप से इस इतिहास से प्रेरणा मिलेगी. श्री शिंदे ने कहा कि यह पीढ़ी निश्चित रूप से राष्ट्र के विकास में योगदान देगी, यह वर्ष स्वतंत्रता का अमृत महोत्सव वर्षगांठ है और 'साहिबजादे बाबा जोरावर सिंह जी और बाबा फतेह सिंह जी' का शहीदी दिवस ' वीर बाल दिवस' के रूप में मनाया जा रहा है. यह सभी के लिए एक यादगार ऐतिहासिक घटना है.

 

गुरु गोबिंद सिंह ने 'वाहेगुरु जी का खालसा वहीगुरु जी की फतेह' की घोषणा कर लोगों को अन्याय के खिलाफ लड़ने की ताकत दी. देश के स्वतंत्रता संग्राम के क्रांतिकारियों में महाराष्ट्र और पंजाब का समान संबंध रहा है. चाफेकर बंधुओं और भगतसिंह के साथ राजगुरु जिन्हें फाँसी दी गई थी, वे महाराष्ट्र के थे. दोनों राज्यों में क्रांतिकारियों की गौरवशाली परंपरा रही है, ऐसा मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा.

 

मुख्यमंत्री ने यह भी कहा कि महाराष्ट्र और पंजाब का घनिष्ठ संबंध है, दोनों राज्यों की मिट्टी ने अनेक वीरों और महान संतों को जन्म दिया है. ये दोनों राज्य शतको से सामंजस्य में रहे हैं. संत नामदेव का धाम घुमान में है जबकि नांदेड़ में गुरु गोबिंद सिंह जी का समाधि स्थल सचखंड श्री हजूर साहेब है.

 

इस मौके पर मुख्यमंत्री ने याद किया कि वर्ष 2008 में महाराष्ट्र सरकार की ओर से गुरु गोबिंद सिंह जी की 300वीं पुण्यतिथि बड़े पैमाने पर मनाई गई थी.  मुख्यमंत्री श्री शिंदे ने इस बात पर प्रकाश डाला कि मराठी और पंजाबी का कृषि से लेकर देश की सीमा सुरक्षा तक अटूट संबंध है. गुरु गोबिंद सिंह जो पंजाब से थे, महाराष्ट्र के नांदेड़ पहुंचे, तो, संत नामदेव महाराष्ट्र से थे और पंजाब पहुंचे, मुख्यमंत्री ने कहा कि संत नामदेव का अभंग 'गुरु ग्रंथ साहेब' में शामिल है.

 

गुरु गोविंद सिंह साहेब जैसे ही छत्रपति शिवाजी महाराज अपनी देशभक्ति और अपनी अद्भुत वीरता के लिए जाने जाते हैं. शिवाजी महाराज ने मुगलों के खिलाफ लड़ाई लड़ी. शिवाजी महाराज के पुत्र छत्रपति संभाजी महाराज को भी मुगलों ने बहुत सताया,  संभाजी महाराज ने पीछे हटे बिना अपना स्वाभिमान नहीं छोड़ा. मुख्यमंत्री ने इस मौके पर यह भी कहा कि इन महापुरुषों के बलिदान से युवा पीढ़ी को प्रेरणा मिलने की उम्मीद करने में कोई हर्ज नहीं है.

 

इस आयोजन के दौरान लगभग तीन सौ बाल कीर्तनों ने 'शबद कीर्तन' किया. इसमें प्रधानमंत्री और मुख्यमंत्री शामिल हुए. साथ ही इस अवसर पर प्रधानमंत्री श्री मोदी ने  दिल्ली में निकाले गए मार्च पास्ट को हरी झंडी दिखाकर रवाना किया.

           

00000000000

 

 

हमारे ट्वीटर हँडल को फॉलो करे : http://twitter.com/MahaMicHindi

‘वीर बाल दिवसा’च्या इतिहासामुळे तरूण पिढीला शौर्य, देशप्रेम व त्यागाची प्रेरणा मिळेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 





 



वीर बाल दिवस’ या ऐतिहासिक कार्यक्रमात प्रधानमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री सहभागी


नवी दिल्ली, 26 : ‘वीर बाल दिवसच्या इतिहासामुळे देशातील तरूण प‍िढीला शौर्य, देशप्रेम आणि त्यागाची प्रेरणा मिळेल, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केल्या.

 

       येथील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ऐतिहासिक वीर बाल दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री शिंदे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु तसेच गृहनिर्माण नागरी विकास मंत्री हरदिप सिंग पुरी,  केंद्रीय संस्कृती राज्य मंत्री अर्जुन मेघवाल, म‍ीनाक्षी लेखी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

 

            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, वीर बाल दिवस सारख्या सर्वोच्च त्याग सोहळयाच्या आयोजनामुळे इतिहासाची  प्रेरणा नक्कीच निर्माण होईल. यामुळे ही पिढी राष्ट्र विकासात आपले योगदान निश्चितच देईल, असे सांगुन श्री शिंदे म्हणाले,  हे वर्ष स्वातंत्र्यांचे अमृत महोत्सवी वर्ष असून या वर्षात साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांचा शहीदी दिवस  वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जात आहे. ही सर्वांसाठी संस्मरणीय ऐतिहासिक अशी घटना आहे.

            गुरू गोबिंद सिंग यांनी वाहेगुरू जी का खालसा वाहेगुरू जी की फतेहअशी उद्घोषणा देऊन अन्याया विरोधात लढण्याची ताकत लोकांना दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढयातील क्रांतीकाऱ्यांमध्ये  महाराष्ट्र आणि पंजाबचा संबंध समसमान आहे. चाफेकर बंधू आणि भगतसिंह यांच्या सोबत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचेच होते. दोन्ही राज्यात क्रांतीकारांची एक गौरवशाली परंपरा आहे.

            महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आत्मीयतेचं नातं असल्याचेही मुख्यमंत्री  म्हणाले, दोन्ही राज्यातल्या मातीने अनेक वीरांना, महान संतांना जन्म दिलेला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये शतकांपासून एकोपा आहे. घुमान मध्ये संत नामदेव यांचे निवासस्थान आहे तर  नांदेडमध्ये गुरुगोबिंद सिंग जी यांचे समाधी स्थळ संचखंड श्री हजु़र साहेब  आहे.

            वर्ष 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने गुरु गोबिंदसिंग जी यांची 300 वी पुण्यतिथी गुरु-ता-गद्दी  समारोह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला असल्याची आठवण याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी केली. शेती ते देशाच्या सीमासुरक्षेपर्यंत मराठी आणि पंजाबी यांचे एक अतूट नाते असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी अधोरेखित केले. गुरु गोबिंदसिंग जी पंजाबचे होते ते महाराष्ट्रात नांदेडला पोहचले. तर, संत नामदेव हे महाराष्ट्राचे होते ते पंजाबला पोहचले. संत नामदेव यांचे अभंग गुरु ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री यांनी योवळी केला.

 गुरू गोंबिदसिंग साहेंबासारेखच छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रप्रेम आणि त्यांच्या अद्भुत शौर्यासाठी ओळखले जातात. महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढा दिला.  शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनाही मुघलांनी छळले तरी देखील संभाजी महाराजांनी माघार न घेता स्वाभिमान सोडला नाही. सर्वोच्च असे बलिदान या महापुरुषांनी दिले, त्याची प्रेरणा घेऊन तरूण पिढी वागेल अशी आशा बाळगायला हरकत नसल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

1984 मध्ये झालेल्या दंगलीत हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शीख बाधंवांना महाराष्ट्रात आश्रय दिले, याची आठवण यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केली.

 जी 20 चे अध्यक्षपद भारताला मिळालेले आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब असून यातील काही बैठका राज्यातील शहरांमध्ये होत असल्याची माहिती श्री शिंदे यांनी यावेळी दिली.

       या कार्यक्रमा दरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांनी ‘शबद कीर्तन’ केले.  प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री  यात सहभागी झाले. तसेच यावेळी येथे (दिल्लीत) काढण्यात आलेल्या मार्च पास्ट ( फेरीला) प्रधानमंत्री श्री मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

छोटे साहिबजादे यांच्या विषयी

 

     अवघ्या 9 आणि 6 वर्षांचे असणारे छोटे साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी़ यांनी मुघलांची शरणागती न पत्करता स्वाभ‍िमानाने सर्वोच्च त्याग करून धर्माचे रक्षण करत  मरण कबूल केले.  

 श्री गुरु गोबिंदसिंग यांचे सुपुत्र, साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी, यांचा बलिदानाचा दिवस, 26 डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा प्रधानमंत्री श्री मोदी यांनी , श्री गुरु गोबिंदसिंग जी  यांच्या प्रकाश पुरबच्या दिनी 9 जानेवारी 2022 रोजी केली होती.

 

       साहिबजादे यांच्या असामान्य धैर्य आणि शौर्याची कथा, देशातल्या सर्व नागरिकांपर्यंत  विशेषतः तरुण मुलांपर्यंत पोहोचवून या इतिहासाविषयी त्यांना जागरूक करण्यासाठी सरकार अनेक संवादात्मक आणि सहभागात्मक कार्यक्रमांचे  संपूर्ण देशभर आयोजन करीत आहे. याचाच  एक भाग म्हणून, देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये, निबंध लेखन, प्रश्न मंजूषा आणि इतर उपक्रम राबवले जात आहेत. तसेच, रेल्वे स्थानके, पेट्रोल पंप, विमानतळे अशा सार्वजनिक ठ‍िकाणी याविषयी माहिती देणारी डिजिटल प्रदर्शने लावली जाणार आहेत. त्यासह संपूर्ण देशभरात, अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील.   या कार्यक्रमांमधून छोटे साहिबजादे यांचे आयुष्य आणि त्यांच्या बलिदानाची कथा, गाथा  सांग‍ीतली जाईल.