नवी दिल्ली, 28 : परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक, अमरज्योत कौर
अरोरा यांनी राज्याचे नवनियुक्त राज्यपाल श्री. रमेश बैस यांची महाराष्ट्र सदन येथे आज सदिच्छा भेट घेतली.
यावेळी श्रीमती अरोरा यांनी श्री. रमेश बैस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे कार्य, प्रकाशित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली.
No comments:
Post a Comment