Sunday, 30 April 2023

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 









नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

 

कस्तुरबा गांधी मार्गस्थित आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रगीता सोबत राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा... उपस्थितांनी गाऊन ध्वजवंदन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी  कस्तुरबागांधी स्थित महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करुन अभिवादंन केले.

या कार्यक्रमास राज्यसभेचे खासदार इमरान प्रतापगडी, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागंत, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कस्तुरगांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय व महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने  पदमावती कला संस्कार समुहाच्यावतीने महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी  चार वाजता पासून सुरु होणार आहे.

यासह सार्वजनिक उत्सव समिती यांच्यावतीने माणिक निर्मित  अतुल अरुण दाते प्रस्तुत ललना मना  कवियत्री, गीतकार, स्त्री संगीतकार, कथा लेखिका , दिग्दर्शिक , निर्मित्या  यांना मानाचा मुजरा... स्त्री कलानिर्मितीची 700 वर्ष !!  असा सांस्कृतिक कार्यक्रम आज सायंकाळी 6 वाजता श्रीराम सेंटर, मंडी हाऊस येथे होणार असून दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठी बांधवांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून मनमुराद आनंद लुटावा, असे आयोजकांच्यावतीने आव्हान करण्यात  आले आहे.   

राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी




नवी दिल्ली, 30 राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

         कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात प्रभारी  निवासी  आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी   यांनी राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी    कर्मचाऱ्यांनी  राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा :

http://twitter.com/MahaGovtMic

वि.वृ.क्र. 78 /दि.30.4.23                              

 

Friday, 28 April 2023

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील एकोणीस नागरिक मायभूमित दाखल

 







 नवी दिल्ली, 28: सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे.  या मोहिमे अंतर्गत आज पालम वायुसेना विमानतळावर वायुसेनेचे विशेष विमान  (सी-17)  400 भारतीय नागरिकांना घेऊन दाखल झाले आहे.  यात महाराष्ट्रातील  19 नागरिकांचा समावेश आहे.  

महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून सुदान येथुन परत आणलेल्या नागरिकांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी  आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आले आहे. सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य

                 दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वयाचे कार्य होत आहे. विमानतळावर स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे.

          सुदाननमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील नागरिकांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

कैंसर के इलाज का 'एनसीआई' मध्य भारत का स्वास्थ्य मंदिर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुर में राष्ट्रीय कैंसर संस्थान का उद्घाटन प्रदेश में बेहतर इलाज व्यवस्था स्थापित करने के लिए सरकार प्रतिबद्ध

 





नई दिल्ली 28 : नागपुर में राष्ट्रीय कैंसर संस्थान (एनसीआई)की स्थापना गुरवार को हुई ।  कैंसर जैसी लाइलाज बीमारी से पीड़ित मरीजों और उनके परिजनों को इसे बड़ी राहत मिलेगी। यह संस्था विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगाना सहित मध्य भारत के राज्यों के लिए स्वास्थ्य मंदिर बन रही है ।इसके उदघाटन समारोह  पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि, यह सरकार राज्य में भी बेहतर स्वास्थ्य व्यवस्था बनाने के लिए प्रतिबद्ध है।

जामथा क्षेत्र में समृद्धि हाईवे के जीरो माइल के पास स्थित राष्ट्रीय कैंसर संस्थान का उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ने किया. मुख्यमंत्री श्री. शिंदे बतौर मुख्य अतिथि बोल रहे थे। केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधायक चंद्रशेखर बावनकुले, राष्ट्रीय कैंसर संस्थान के अध्यक्ष एड. सुनील मनोहर, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगलेकर सह अन्य हस्तियाँ मौजूद थे । इस धर्मार्थ कार्यक्रम में विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उद्योग और वाणिज्य के दिग्गज सर्वेश्री गौतम अदानी, दिलीप सिंघवी, समीर मेहता, पार्थ जिंदल और जयप्रकाश रेड्डी भी उपस्थित थे।

मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस संस्थान की स्थापना पर इस सेवा कार्य के लिए  सेवा कार्य के लिए शुभकामनाएं दी हु । उन्होंने आगे बताया की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की इस संकल्पना और कड़ी मेहनत से यह संस्थान बना है । राज्य के लिए स्वास्थ्य सेवा एक बड़ी चुनौती है। हमने हाल ही में कोरोना संकट का अनुभव किया है और कैंसर, जलवायु परिवर्तन और हीट स्ट्रोक जैसी बड़ी समस्या के रूप में उभर रहा है। श्री.फडणवीस के पिता, और मेरी मां की कैंसर से मृत्यु हो गई थी, इन दर्दनाक यादों को पीछे छोड़ते हुए जनप्रतिनिधियों को जनहित के लिए ऐसा दृश्यमान कार्य करने के लिए और हमने यह तरीका अपनाया है

श्री. फडणवीस जब मुख्यमंत्री थे, तब उन्होंने  विदर्भ के लिए एक वरदान के रूप में हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धि राजमार्ग की संकल्पना की और इस परियोजना को पूरा करने के लिए कडे प्रयास किए । इस संस्थान की स्थापना एक बड़ी और ऐतिहासिक उपलब्धि है। इससे सभी सामान्य मरीजों को काफी राहत मिलेगी। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि यह संस्थान विदर्भ के साथ-साथ महाराष्ट्र और मध्य भारत में कैंसर के इलाज के लिए स्वास्थ्य का मंदिर बनेगा। उन्होंने यह भी आशा व्यक्त की कि जनप्रतिनिधि इस संस्था का दौरा करेंगे और इस कार्य से प्रेरणा लेकर अपने-अपने क्षेत्र में ऐसे सेवावरात्रि आरोग्य मंदिर स्थापित करेंगे। उन्होंने यह भी विश्वास जताया कि राज्य सरकार ऐसी संस्थाओं के साथ मजबूती से खड़ी रहेगी । आगे जानकारी देते हुए श्री. शिंदेने बताया की, राज्य सरकार सभी आम जनता को अच्छी स्वास्थ्य सेवाएं प्रदान कर रही है। 'महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना' और 'मुख्यमंत्री सहायता कोष' से काफी मदद मिली रही है।

 

देश को कैंसर मुक्त बनाने में मददगार होगा एनसीआई- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

विदर्भ के मरीज कैंसर के इलाज के लिए मुंबई और अन्य जगहों पर जाने के बजाय एनसीआई में नागपुर में उन्नत उपचार प्राप्त कर सकते हैं। केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने अपने भाषण में विश्वास जताया कि यह संस्था बेहतर इलाज और शोध से देश को कैंसर मुक्त बनाने में मददगार साबित होगी ।  अमेरिका में कैंसर के मामलों में 33 फीसदी की गिरावट आई है। हालांकि भारत में कैंसर के मरीजों की संख्या बढ़ रही है। उन्होंने यह भी कहा कि अगर देश में एनसीआई जैसे संगठन स्थापित हो जाएं तो कैंसर के मरीजों की संख्या घटेगी और देश को इस बीमारी से निजात दिलाने में मदद मिलेगी।

 

 

अत्याधुनिक कैंसर उपचार और अनुसंधान केंद्र स्थापित किया जाएगा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने अपने भाषण में कहा, विदर्भ में कैंसर के मरीज इलाज के लिए मुंबई और देश के अन्य हिस्सों में जाते रहे है । इसी कार्य को आगे बढ़ाते हुए मरीजों के परिजनों के नि:शुल्क आवास के लिए यहां धर्मशाला की स्थापना की जाएगी। उन्होंने यह भी जानकारी दी कि पूर्वी विदर्भ में बड़ी संख्या में थैलेसीमिया और सिकल सेल रोगी हैं और इस बीमारी पर शोध और उपचार के लिए निकट भविष्य में एनसीआई में एक शोध केंद्र स्थापित किया जाएगा।

 

कैंसर के इलाज की महान संस्था है NCI - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

कैंसर एक लाइलाज बीमारी है और कैंसर पीड़ितों को अपनेपन और साहस की जरूरत होती है।सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ने कहा कि नागपुर में स्थापित संस्था एनसीआई ने कैंसर पीड़ितों को हिम्मत दी है और उनके इलाज के लिए यह एक बड़ी संस्था बन गई है। डॉ. आबाजी थत्ते के नाम और परोपकारी कार्यों से जुड़ी यह संस्था कैंसर पीड़ितों को बड़ी राहत देगी।  एक तरफ सरकार संस्थानों का निर्माण करती है, लेकिन स्वास्थ्य जैसे सार्वजनिक मुद्दों पर देश के सभी लोगों को खुद आगे आना चाहिए। समाज के विभिन्न तत्वों से स्वास्थ्य देखभाल के लिए एनसीआई जैसी संस्था बनाने की पहल करने की भी अपील डॉ. भागवत ने इस समय की।

 

सेवा संकल्प को मजबूत करेगा एनसीआई- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह का संदेश

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह अपरिहार्य कारणों से कार्यक्रम में शामिल नहीं हो सके। श्री शाह का लिखित संदेश राष्ट्रीय कैंसर संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगलेकर ने पढ़ा। शाह ने अपने संदेश में कहा, 'कैंसर से मुक्ति की ओर पहला कदम' NCI का आदर्श वाक्य है। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि एनसीआई की प्रेरणा से भारत देश में सेवा के मिशन को समर्पित संस्थाओं को बल मिलेगा। उन्होंने इस बात पर भी संतोष व्यक्त किया कि डॉ आबाजी थत्ते सेवा एवं अनुसंधान संस्थान के सहयोग से दो दशकों से इस संस्थान को बनाने का सपना साकार हो रहा है।

 

0000000000

A.    Arora /28.04.2023

Thursday, 27 April 2023

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमित दाखल महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे स्वगृही सुखरूप परतले

 




नवी दिल्ली, 27: सुदानमध्ये अंतर्गत संघर्षामुळे तेथील नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावे लागत आहे. यात काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. भारत सरकारच्या विशेष विमानांनी  रात्री 360 भारतीय नागरिक दिल्लीत दाखल झाले असून, यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे.  महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून यातील तीन नागरिकांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

       सद्या सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचा वातावरण सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे.

थोडक्यात तपशील

केंद्र शासनाचा विशेष विमान एसवी-3620 जेड्डाह (सौदी अरब) येथून बुध्वारी रात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विशेष विमान दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता.

महाराष्ट्र सदनाद्वारे तीन नागरिकांना स्वगृही सुखरूप परत

             सुदान मधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी  आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.


सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य

                दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वयाचे कार्य होत आहे. विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या नागरिकांना सुखरुप  स्वगृही  पोहचविण्यात येत असून आतापर्यंत तीन नागरिक सुखरूप स्वगृही परतले आहेत.

          सुदाननमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील नागरिकांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

Wednesday, 26 April 2023

‘मन की बात’ राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग


 


नवी दिल्ली, 26 : आकाशवाणीवर दर माहिन्याच्या शेवटच्या आठवडयात प्रसार‍ित होणाऱ्या ‘मन की  बात’ या कार्यक्रमाच्या 100  भागच्या पार्श्वभूमीवर आयोज‍ित दो दिवसीय  राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर  सहभागी झालेत.

            केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आकाशवाणीवर प्रसार‍ित होणाऱ्या  ‘मन की बात’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या विशेष कार्यक्रमाचे 99 भाग पूर्ण झाले असून येत्या रव‍िवारी 30 एप्रिलला याचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. याचे औचित्य साधून आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन विज्ञान भवनात  करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर, विभागाचे सचिव अपूर्व चंद्र व्यासपीठावर उपस्थित होते.

आतापर्यंत प्रसारीत झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रधानमंत्री 700 पेक्षा अध‍िक लोकांशी संवाद साधला आहे. यासह 300 संघटनाचा उल्लेख केला असून यामधले 37 व्यक्ती आणि 10 परदेशी संस्था आहेत. आजपासून सुरु असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये चार सत्रे असणार आहेत.

 महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर या राष्ट्रीय परिषदेस विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, रवीना टंडन, चंद्रकांत दामोदर कुलकर्णी,  बंडू सीताराम धोत्रे, सोनाली हेलवी, राजेंद्र यादव, डॉक्टर रोहीदास बोरसे, चंद्रकिशोर पाटील आणि शर्मिला ओसवाल, वेदांगी कुलकर्णी, शैलेश भोसले, डॉ. अन्यया अवस्थी  या काही लोकांचा  समावेश आहे.

या राष्ट्रीय परिषदेत, देशाच्या विविध भागातील 100 सन्मानन‍ीय नागरिक सहभागी झाले आहेत. या सर्वांचा प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ च्या विविध भागांमध्ये उल्लेख केला आहे. या व्यक्तींनी देश उभारणीत दिलेल्या विशेष योगदानाची दखल प्रधानमंत्री यांनी आपल्या मासिक संवाद कार्यक्रमातून वेळोवेळी घेतली आहे.

पुण्याचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी, आपल्या 16,000 रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतनातून दरमहा 5,000 रुपये, स्वच्छता मोहिमेसाठी देण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपुरचे बंडू सीताराम धोत्रे, ‘पर्यावरण संरक्षण संघटना’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्या संस्थेने, चंद्रपूरचा किल्ला आणि आसपास स्वच्छता मोहीम राबवली. साताऱ्याची सोनाली हेळवी ही महाराष्ट्राच्या 21 वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार आहे.राजेंद्र यादव हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर करुन लसीकरणासाठी  उपयुक्त वाहन तयार केले. पुण्याचे डॉ.बोरसे हे कोविड योद्धा आहेत.

चंद्रकिशोर पाटील यांच्या  नाशिकमध्ये गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठीच्या  प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता. अलिबागजवळील केनाड येथील रहिवासी असलेल्या शर्मिला ओस्वाल गेल्या 20 वर्षांपासून अनोख्या पद्धतीने भरड धान्यांचे उत्पादन करत असून त्यांना ‘मिलेट्स वुमन’ म्हणून त्यांची वेगळी ओखळ त्यांनी निर्माण केली आहे.

उद्घाटन पर सत्रात  उपराष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. त्यापैकी पहिले पुस्तक मन की बात @100 हे कॉफीटेबल पुस्तक आहे आणि यामध्ये या कार्यक्रमाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या कार्यक्रमामुळे प्रधानमंत्री आणि सामान्य नागरिक यांच्या दरम्यानच्या थेट संवादाला उत्तेजन देण्याचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत.

दुसरे पुस्तक आहे प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.वेम्पती यांनी लिहिलेले कलेक्टिव्ह स्पिरीट, काँक्रीट ॲक्शन.   मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांच्या हृदयात  असलेल्या ज्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणविषयक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक तसेच तंदुरुस्तीविषयक समस्यांसह  विविध संकल्पनांवर चर्चा केली त्यांची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहेत.

Saturday, 22 April 2023

राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी





 

नवी दिल्ली , 22 : महात्मा बसवेश्वर यांची  जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. 

 

             कॉपर्निकस मार्ग  स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात  सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी महात्मा बसवेश्वर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   याप्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  महात्मा बसवेश्वर यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र.74, दि.22.04.23


 

Friday, 21 April 2023

 

लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामांचा

'प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार ने सन्मान

 

 नवी दिल्ली, 21 : लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन परिवर्तनया नाव‍िण्यपूर्ण उपक्रमांचा  आज  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागरी सेवा दिनी  'प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा ने गौरव करण्यात आल. लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

       दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस ‘नागरी सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. आज विज्ञान भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत  केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन (DOPT) मंत्रालयांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल. यावेळी केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री सच‍िवालयाचे सचिव डॉ. पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गुबा आणि केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव वी. श्रीनिवास हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी देशभरातील 16 प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा ने गौरव करण्यात आला. यामधे महाराष्ट्रतील  लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि 20 लाख रूपये रोख असे आहे.

 

पुरस्काराने कामात उत्साह आणि समर्पण भावना वाढेल

                                                            जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.  

    लातूर जिल्ह्याने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्यवर्धिनी हा नाव‍िण्यपूर्ण उपक्रम राबविला असून आज प्रधानमंत्री यांच्याहस्ते मिळालेल्या पुरस्काराने संपूर्ण चमूचा उत्साह वाढला असून अधिक समर्पण भावनेने यापुढे सर्व मिळून काम करतील, अशी प्रत‍िक्रिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या. या योजनेचा लाभ जवळपास 50 लाख लोकांनी घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असा आहे ‘आरोग्यवर्धिनी’ उपक्रम

लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’  प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामार्फत लातुर जिल्ह्यात  विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान, उपचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे.  लातूर जिल्ह्यात 233 आरोग्यवर्धिनी केंद्रामधून आरोग्य सेवा सातत्याने दिल्या जात आहेत. यामध्ये गरोदर माता बालक, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयीच्या सेवा, संसर्गजन्य व रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांवरील उपचार, आपात्कालीन आरोग्य सेवा, कान, नाक, घसा विषयक  मानसिक आजारांवरील सेवा, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगा, आहार, व्यायाम यासारखे विविध उपक्रम यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात आरोग्यवर्धिनींच्या सेवा बळकट करण्यासाठी प्रशासनातर्फे निधीची उपलब्धता करुन देणे,औषधांचा पुरवठा, अद्यावत रुग्णवाहिका यासारख्या उपाययोजना, तसेच कर्करोग निदानासाठीचे संज‍ीवनी अभियान, मातामृत्यु रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेला जीवनरेखा कक्ष, लोकांच्या सोयीसाठी गोवोगावी घेतलेली आरोग्य शिबीर आदी नाविण्यपूर्ण उपक्रम आरोग्यवर्धिनीं अंतर्गत  राबविण्यात येतात .

 

 


ऑपरेशन परिवर्तन मुळे स्थानिकांच्या जीवनमान बदलाचा हा सन्मान

                                                           पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे


 ऑपरेशन परिवर्तन मुळे स्थानिकांच्या  जीवनमान बदलाचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. ते म्हणाले, तत्कालीन  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा यात सिंहाचा वाटा आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायास आळा बसला व समूळ उच्चाटन झाले. स्थान‍िक लोकांच्या हाताला स्वंय रोजगाराची साधने उपलब्ध झाल्यामुळे ते अवैद्य दारू विक्रीपासून परावृत्त झाले.

असा आहे ऑपरेशन परिवर्तन हा नाविण्यपूर्ण उपक्रम

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायावर आळा घालण्याकरीता  व त्याचे समूळ उच्चाटनासाठी  ‘ऑपरेशन पर‍िवर्तन’ वर्ष 2021-22 मध्ये  नावीन्यपूर्ण पद्धतीचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या उपक्रमास पोल‍ीस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ यामुळे त्यांचे आयुष्य पालटले.  या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील  हातभट्टी  दारू निर्मिती व विक्रीची 117 ठिकाणे निश्चित करुन त्यातील गांवे जिल्ह्यातील  पोलिस निरिक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक  अधिका-यांना दत्तक देण्यात आली. सातत्यपूर्ण कारवाई, समुदेशन, पुनर्वसन,  जागृती या चार टप्यावर राबविण्यात आल.

     या उपक्रमामध्ये अवैध हातभट्टी  व्यवसाय करणारे लोकांना त्यांच्या या अवैध व्यवसायापासून परावृत करुन त्यांना  इतर व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांना आर्थिक  मदत मिळवून देणे हे मुख्य ध्येय होते.  यादृष्टीने त्यांचे समुपदेशन केले गेले.

            अवैध व्यवसायाची ठिकाणे नष्ट करुन हा व्यवसाय संपूर्णपणे मोडीत काढू सदर व्यवसाय करण्याची व्यक्तीची  प्रवृती त्याचे मनातून मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. ज्याचा परिणाम म्हणून उपरोक्त प्रमाणे 726 व्यक्तींनी स्वत: चा पारंपारिक दारुचा व्यवसाय सोडून देऊन समाजामध्ये ताठ मानेने जगता येण्यासारखे व्यवसाय अंगिकृत केलेले आहेत.  त्यांच्या या कामाची दाखल घेत त्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र.73, दि.21.04.23