नवी दिल्ली , 14: स्वराज्य
रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी
करण्यात आली.
कोपरनिकस मार्ग
स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश
अडपावार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी परिचय केंद्राच्या
प्रभारी उपसंचालक अमरज्योत अरोरा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजी
महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून
अभिवादन केले.
शासनाने छत्रपती
संभाजी महाराज यांची शासकीय स्तरावर साजरी करण्याचा महत्तवाचा निर्णय घेतला असून,
राज्यात आता छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाणार
आहे.
****
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic


.jpeg)
No comments:
Post a Comment