नवी दिल्ली 21 : भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र मुंबई यांनी महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने खेलो इंडिया महिला ऍथलेटिक्स लीग (शहर/विभाग स्तर) 2023 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा, पुणे येथे होणार असल्याची घोषणा केली आहे.
ही स्पर्धा 22 सप्टेंबर 2023 पासून बाबुराव सणस मैदान, सारसबाग, पुणे, येथे होणार आहे. देशभरातील प्रत्येक शहरातील सुमारे 300 खेळाडू 14 स्पर्धा प्रकारांमध्ये (ट्रॅक आणि फील्ड आणि रोड इव्हेंट श्रेणींमध्ये) सहभागी होतील. एक खेळाडू जास्तीत जास्त 2 प्रकारांमध्ये सहभागी होऊ शकतो.
या लीगमध्ये होणा-या विविध क्रीडाप्रकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
ट्रॅक आणि फील्ड: 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 5000 मी; लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक.
खेळाडूंना आपली नावे खालील लिंकवर नोंदणी करता येईल:
http://www.smrsports.in/
खेलो इंडिया महिला ऍथलेटिक्स लीगमध्ये महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातील महिला खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. धावणे, उडी, थ्रो आणि रोड रेस यासह विविध ट्रॅक आणि फील्ड क्रीडाप्रकारात खेळाडूंना चमकण्याची एक विलक्षण संधी असेल.
खेलो इंडिया महिला लीगचा मुख्य उद्देश केवळ देशांतर्गत स्पर्धा संरचना आणि महिला खेळाडूंची प्रतिभा ओळख मजबूत करणे नाही तर महिला खेळाडूंना स्पर्धा करण्यासाठी आणि करिअर म्हणून क्रीडा क्षेत्रात त्यांचे पाऊल भक्कम करण्यासाठी सक्षम करणे हा आहे.
No comments:
Post a Comment