नवी दिल्ली 21 : महाराष्ट्र सदनात यंदाही गणरायाची
प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. राज्यपाल
श्री. रमेश बैस यांनी आज सायंकाळी महाराष्ट्र सदनातील गणरायाचे दर्शन
घेतले व श्री गणेशाची विधिवत आरती केली.
यावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी, निवासी आयुक्त व प्रधान सचिव रुपिंदर
सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार
यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल श्री बैस यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व जनतेला सुख, समृद्धी लाभू दे, अशी प्रार्थना केली.
****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.176 / दिनांक 21.9.2023
No comments:
Post a Comment