नवी दिल्ली २५ : पंडितडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.
कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी अभिषेक जाधव यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
0000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 177, दि.25.09.2023
No comments:
Post a Comment