नवी दिल्ली,2: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री भारतरत्न लालबहादूर
शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात
आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी महात्मा
गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश
अडपावार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित
महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही
प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.
0 0 0 0 0
आम्हाला ट्विटर वर
फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.180 / दिनांक 02.10.2023
No comments:
Post a Comment