नवी
दिल्ली, २८: थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती महाराष्ट्र सदन व
महाराष्ट्र परिचय आज केंद्रात साजरी करण्यात आली.
कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात,
निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदरसिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरक
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे
अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र
अभिवादन
थोर विचारवंत-साहित्यिक स्वातंत्र्यवीर
सावरकर यांची जयंती महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. परिचय
केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील
उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
*****************
आम्हाला एक्सवर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.64 / दिनांक 28.05.2024
No comments:
Post a Comment