नवी दिल्ली, ३१: प्रजाहितदक्ष,
कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांची जयंती
आज उभय महाराष्ट्र
सदन व महाराष्ट्र
परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
अर्धाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अपर
निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता
शेलार यांच्यासह
उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या
अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
पुतळयास व प्रतिमेस पुष्प
अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना
अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन
केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
*****************
आम्हाला एक्सवर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.65 / दिनांक 31.05.2024
No comments:
Post a Comment