नवी दिल्ली, 5: शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक मोबाईल ऍप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी,
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, श्रीमती सुकन्या मुजुमदार यासह वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2024 चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. शालेय विभागात गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके तर कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्मेल अँड ज्युनिअर कॅलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे, तर उच्च शिक्षण विभागात पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका प्रा.डॉ. शिल्पागिरी प्रसाद गणपुले, आयआयएसइआर पुणे संस्थेतील प्रा. श्रीनिवास होथा तसेच भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशक विवेक चांदलिया या शिक्षकांचा समावेश आहे.
मंतैय्या बेडकें विषयी
श्री. मंतैय्या बेडके या उपक्रमशील शिक्षक यांना 2024 वर्षाचा शालेय शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers’
लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे.
सागर बगाडे विषयी
श्री. सागर बगाडे या उपक्रमशील शिक्षक यांना 2024 वर्षाचा शालेय शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers’
विकी चंदालिया
कोल्हापूर जिल्ह्याचे चित्रकार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निर्देशक विकी चिमन चांदलिया यांना हस्तकला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशकांसाठीचा 2024 मधील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पेंर्टिग आणि स्प्रे चित्रकला या कला क्षेत्रात 500 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.
प्रा. डॉ. शिल्पागौरी प्रसाद गणपुले
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय,(Akurdi) आकुर्डी,
प्रा. श्रीनिवास होथा
प्रा. श्रीनिवास होथा हे कार्बोहायड्रेट रसायनशास्त्रातील नामांकित संशोधक असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. आंध्र प्रदेशात जन्मलेल्या होथा यांनी आंध्र विश्वविद्यालयातून बी.एससी. केली व पुढे त्यांनी न्यूयॉर्कच्या रॉकफेलर विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल अभ्यास करून देशात परतले आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या संशोधनात कार्बोहायड्रेट रसायनशास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदान असून, त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कठोर आणि पारदर्शक निवड प्रक्रियेव्दारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिक्षक दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम संपूर्ण भारतात आयोजित केला जातो. देशातील शिक्षकांच्या अव्दितीय योगदानाचा गौरव करणे व ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समिर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही, तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द केले आहे, त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारचा उद्देश आहे.
या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 50 शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील 16 शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 16
शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, 50,000 रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
**********
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 113/ दिनांक 05.09.2024
No comments:
Post a Comment