Wednesday, 2 October 2024

राजधानीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी





 

 

नवी दिल्ली, 2 : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

 

कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 127/ दिनांक 02.10.2024


 

No comments:

Post a Comment