Thursday, 24 May 2018

तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र शासन अनुकूल



शेतक-यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करणार नाही
पणन मंत्री सुभाष देशमुख

नवी दिल्ली 24 : शेतक-यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील  खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षीत असून शेतक-यांनी तूर खरेदीबाबत आश्वस्त राहावे, असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी आज पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी  केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्र्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली असून तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र शासन अनुकूल आहे. या बैठकीला केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यासह केंद्रीय सचिव पटनायक, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक चढ्ढा उपस्थित होते.

राज्यात यावर्षी 1 फेब्रुवारीपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झाली. खरेदीचा विहीत कालावधी संपल्यानंतर 15 मे पर्यंत केंद्र शासनाने मुदतवाढ दिली होती. मात्र यावर्षी तूर खरेदीचे उद्दीष्ट ४४ लाख क्विंटल असून त्यापैकी १५ मे पर्यंत 193 खरेदी केंद्रावर 33 लाख 15 हजार 132 क्विंटल तूर खरेदी झाली आहे. त्यामुळे आणखी मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांची तूर खरेदी होण्यासाठी प्रयत्न सुरू असून केंद्र शासनाने मुदतवाढ देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. लवकरच मुदतवाढीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

Wednesday, 23 May 2018

महाराष्ट्रातील सुनील तोटे यांचा ‘ब्रिक्स’ कडून सन्मान



नवी दिल्ली, 23 : महाराष्ट्रातील सुनील तोटे यांना शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याबद्दल आज ब्रिक्स च्या ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम तर्फे  सन्मानित करण्यात आले. केंद्रीय प्रधानमंत्री कार्यालय राज्यमंत्री जितेंद्र सिंग व ब्रिक्स अलायन्स-बिसनेस फोरमच्या अध्यक्षा लरीसा झेलेंटसोवा यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
            येथील ताज डिप्लोमॅटीक एनक्लेव मध्ये दिनांक 21 ते 23 पर्यंत ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम च्या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. आज समारोपीय समारंभात ब्रिक्स अलायन्समध्ये सामील असणा-या देश-विदेशातील  विविध क्षेत्रात नाविन्यपुर्ण काम करणा-या ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम च्या तर्फे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास  केंद्रीय प्रधानमंत्री कार्यालय राज्यमंत्री जितेंद्र सिंग, ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम च्या अध्यक्षा लरीसा झेलनस्टेवा, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम च्या वतीने देश-विदेशातील विविध क्षेत्रात नाविन्यपुर्ण कार्य करणा-या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सुनील तोटे यांचा यामध्ये समावेश होता.
फळ-भाज्यांच्या  लागवडीचा नाविन्यपुर्ण प्रयोग
सुनील तोटे हे मुळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील कानगाव चे आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून ते बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळखले जातात. मात्र, मुळ शेतकरी कुंटूबात जन्माला आल्यामुळे शेतीविषयी ओढ आहे. पांरपरिक शेती न करता काही प्रयोगशील करण्याची ईच्छा होती. 20 एकर शेतीमध्ये त्यांनी  शेवगा, कोहळ, कारले, काकडी, दूधी भोपळा अशा 5 फळ-भाज्यांची लागवड केली. आणि 1 कोटीचे उत्पन्न मिळविले. त्यांच्या या प्रयोगशील लागवडीबद्दल आज त्यांना आंतराराष्ट्रीय संघटनेव्दारे सन्मानित करण्यात आले.
वर्तमानात ते शेतक-यांना एकत्रित करून कंत्राटी शेती करण्याकडे प्रेरित करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी 80 हजार शेतक-यांना जोडलेले आहे. सर्वांनी मिळून शेती केल्यास सर्वांनाच नफा वाटून मिळणार, अशी संकल्पना या मागची आहे.
ब्रिक्स हे संघटन आंतराराष्ट्रीय पातळीचे असून सध्या या संघटनेशी 36 राष्ट्रे जुळलेली आहेत.

हे संघटन विविध विषयांवर काम करते यामधले ब्रिक्स अलायन्स- बिझनेस फोरम हे मुख्यत: ब्रिक्स देशांमधील गुंतवणुकीसाठी आर्थिक सहकार्य देण्याचे कार्य करते. बिसनेस फोरम हे  डिजीटल इकोनॉमी, उद्योग, परिवहन, पायाभूत सूविधा, बँकींग, आर्थिक सेवा आणि विमा, आरोग्य, ऊर्जा, खनिजे आणि त्यांची उपयुक्तता, कृषी व अन्न प्रक्रिया, वस्तु आणि किरकोळ विक्री, कौशल्य विकास, संशोधन आणि सेवा, प्रसार माध्यमे, मनोरंजन आणि जीवनशैली क्षेत्रात कार्य करते.
000000
     आम्हाला ट्विटर वर फॉलो करा  http://twitter.com/micnewdelhi
सूचना सोबत छायाचित्रे जोडली आहेत.

मपकेंनदि-अंजूनिमसरकर,मा.अ.,वृत्त क्रं.207दि.23-05-18

पाकिस्तानातून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात : केंद्रीय वाणिज्य मंत्रालय







नवी दिल्ली, २३ : पाकिस्तानातून साखर आयातीबाबत प्रसार माध्यमातून देण्यात आलेली माहिती चुकीची असून चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानातून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आल्याचे  केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानातून केल्याजाणाऱ्या साखर आयातीबाबत काही प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची  माहिती प्रसिध्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आज यासंदर्भात खुलास करण्यात आला.
                                   
                          पाकिस्तानातून 1908 मेट्रिक टन साखर आयात

               चालू आर्थिक वर्षात 14  मे 2018 पर्यंत पाकिस्तानातू केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आली असून त्याची किंमत 0.657 दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तुलनेने 2017-18 यावर्षात पाकिस्तानातून 13 हजार 110 मेट्रिक टन साखर आयात करण्यात आली होती त्याची किंमत 4.68 दशलक्ष अमेरिकन डॉलर होती.

 भारतात प्रामुख्याने ब्राझील कडून  साखरेची आयात केली जाते. 2017-18 च्या गळीहंगामात देशात साखरेचे उत्पादन  31.90 मेट्रिक टन झाले. या वर्षभरातच देशातून  1.75 दशलक्ष टन साखरेची निर्यातही झाली.  एप्रिल-मे 2018 या दोनच महिन्यात साखरेची एकूण निर्यात 240.093 मे.. इतकी होती. म्हणजेच भारतातील साखरेचे एकूण उत्पादन निर्यात यांच्या तुलनेत पाकिस्तानातून होणारी आयात अत्यल्प असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तान सरकारने त्यांच्या निर्यात साखरेवर प्रती किलो 10.7 रूपयांचे अंशदान (सबसिडी) दिल्याचेही वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

                               भारतात साखरेची आयात पूर्णपणे मोफत
 
     
सध्या भारतात साखरेवर 100 टक्के सीमा शुल्क असून साखरेची आयात मोफत होते. भारतात आयात होणाऱ्या कोणत्याही मालावर पाकिस्तानबाबत विशिष्ट निर्बंध घालण्यात आले नसल्याचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जागतिक व्यापारसंघटनेचा "एमएफएन' करार भारतासह या संघटनेच्या सभासद असलेल्या पाकिस्तान व अन्य देशांवर बंधनकारक आहे. ( यानुसार सर्व देशांनी आपले आयात-निर्यात धोरण एकसारखेच लागू करणे भेदभाव करणे अपेक्षित आहे.)



                                      
                           देशातील साखर आयातीवर दृष्टीक्षेप

            साखरेच्या किमतीच्या दृष्टीने विचार केल्यास आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये भारताने 1019 दशलक्ष अमेरिकन डॉलर किमंतीची साखर या केली होती. 2017-18 मध्ये साखर आयातीत 934 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी घट झाली. यंदा एप्रिल-मे 2018 या काळात साखरेची एकूणआयात 37.75 दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे.
 देशात 2016-17 मध्ये 2.14 दशलक्ष मे.टन साखरेची आयात झाली. वर्ष 2017-18 मध्ये त्यात किंचित वाढ होऊन साखर आयातीचे प्रमाण 2.40 दशलक्ष मे. टन इतके झाले. एप्रिल-मे 2018 दरम्यान एकूण साखर निर्यात 116, 2512 मे.टन होती. 

 ब्राझीलकडून आपल्या देशात बहुतांश साखर आयात केली जाते. प्रागतिक अधिकृत किंवा प्रमाणित पध्दतीनुसार साखरेची आयात देशांतर्गत विक्रीसाठी केली जात नाही तर केवळ निर्यातीसाठीच ही साखर आयात केली जाते. सीमाशुल्क अदा करण्यासाठी आयातदारांना एमईआयएस (भारतातून होणारी व्यापारी निर्यात) पध्दतीचा वापर करणे बंधनकारक आहे. यात सरकारकडून त्यांना निर्यातीच्या किंवा निर्यात रकमेच्या प्रमाणात काही पिशव्या दिल्या जातात. या पिशव्या व्यापरमुक्त असल्याने आयातदार त्या अन्य निर्यातदारांकडूनही  खरेदी करू शकतात.

                        
पाकिस्तानातून आयात साखरेच्या दर्जावर नजर

पाकिस्तानातून मुंबई वाघा येथे आयात होणाऱ्या साखरेच्या दर्जाची बारकाईने तपासणीकरणे आणि एफएसएसएआयच्या प्रयोग शाळांमध्ये या साखरेची काटेकोर तपासणी करण्याबाबत वाणिज्य मंत्रालयाने सीमाशुल्क विभागास विनंती केली आहे . 
                         
                देशातून झालेल्या साखर निर्यातीबाबत संक्षेपात
 

2016-17 मध्ये भारताने 2.54 दशलक्ष मे.टन साखरेची निर्यात केली. 2017-18 मध्ये त्यात 1.75 दशलक्ष मे.टन इतकी घट झाली. 2018-19 या आर्थिक वर्षातील एप्रिल-मे या दोन महिन्यांसाखरेची एकूण निर्यात 240,093 मे.टन होती.

                                           000000  
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा  http://twitter.com/micnewdelhi