Monday, 28 July 2025

दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवनाचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर



नवी दिल्ली, 28 :  दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनामार्फत  दिल्लीमध्ये बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र सदन परिसरात त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्याचा प्रस्तावित आराखडा निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकताच सादर केला.

 

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी महाराष्ट्र सदनाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत श्रीमती आर विमला यांनी विविध प्रस्ताव सादर केले.  यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक भवनाबाबत सविस्तर चर्चा झाली. या सांस्कृतिक भवना मध्ये बहूउद्देशीय सभागृहमहाराष्ट्रातील भारतीय प्रशासकीय सेवेतील विविध पदांसाठी मुलाखत पात्र उमेदवारांसाठी निवास व्यवस्थाप्रशस्त ग्रंथालय व अभ्यासिका व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.  

 

तसेच महाराष्ट्र सदन परिसरातील अधिकारी व कर्मचारी निवास स्थाने आणि अन्य प्रशासकीय बाबींसंदर्भात  सविस्तर सादरीकरण निवासी आयुक्त श्रीमती विमला यांनी केले. यासह महाराष्ट्रातील ऋतूनिहाय  फळांचे प्रदर्शन व विक्री दालन आणि बचत गटांच्यामार्फत उत्पादित वस्तूचे प्रदर्शन दालन वर्षभरासाठी य ठिकाणी असावे या संदर्भात सुरु असलेल्या नियोजनची माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र महोत्सव दिल्लीत आयोजित करण्यात यावा यामध्ये  महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडाविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावाअशी मागणी श्रीमती विमला यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यासर्व प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविली असून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

 

       या सादरीकरणास सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक मनीषा पिंगळेसार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता किरण चौधरी,  विद्युत विभागाचे आशुतोष द्विवेदीमाहिती अधिकारी अंजु निमसरकर कांबळे, महाराष्ट्र सदनाचे प्रभारी व्यवस्थापक प्रमोद कोलपते आदी उपस्थित होते.


000000000

महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली - वृत्त विशेष - 155

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic / https://x.com/micnewdelhi / https://x.com/MahaMicHindi



 

Wednesday, 11 June 2025

महाराष्ट्राच्या सागरी विकासासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्रीय मंत्र्यांशी संवाद





 

नवी दिल्ली दि. 11 :  महाराष्ट्रातील सागरी क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राचे सागरी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची दिल्ली येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

 

महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) सागरमाला योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले असून, त्यासाठी 230.24 कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. सध्या 783.08 कोटी रुपये खर्चाच्या 14 प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापैकी 8 प्रस्ताव सागरमाला योजनेसाठी मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या प्रगतीसाठी मंजुरी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या बैठकीत आगामी काळात राज्यातील बंदरे विभागात करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

सागरी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर संवाद घडवून आणण्यासाठी, महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB), मुंबई पोर्ट प्राधिकरण (MbPA), जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA), भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) आणि शिपिंग महासंचालनालय (DGS) यांसारख्या प्रमुख संस्थांची त्रैमासिक संयुक्त बैठक घेण्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना विनंती केली.  विविध संस्थांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावीपणे घेण्यासाठी या बैठका उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी  व्यक्त केला.

 

 

000000000000

अंजू निमसरकर – माहिती अधिकारी / वृत्त विशेष  -128

आम्हाला फॉलो करा

एक्स - 

https://x.com/MahaGovtMic 

https://x.com/micnewdelhi 

https://x.com/MahaMicHindi
 

राजधानीत महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचे उल्लेखनीय कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राचे : निवासी आयुक्त आर. विमला





 

 

नवी दिल्ली, दि. 11: राजधानी मध्ये महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचे  महत्त्वाचे  कार्य  गेली 65 वर्ष महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून होत आहॆ. या कार्यालयाने विविध उपक्रम राबवून मराठीजणांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी परिचय केंद्राच्या सदिच्छा भेटी दरम्यान केले.

 

परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती)  मनिषा पिंगळे यांनी श्रीमती आर. विमला यांचे स्वागत केले. नुकतीच प्रकाशित झालेली खासदार पुस्तिका ही त्यांना भेट देण्यात आली. माहिती केंद्राने आजपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रम, प्रकाशने, तसेच मेळावे यांची माहिती  देण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्र आणि महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून येत्या काळातील विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  

 

यावेळी श्रीमती आर. विमला यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. केंद्राच्या ग्रंथालयाला भेट दिली.  ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तके आणि संदर्भ साहित्याची त्यांनी प्रशंसा केली. भेटीनंतर त्यांनी अभिप्राय नोंदवताना लिहिले, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे भेट देण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक ठरला. केंद्रातर्फे प्रकाशित पुस्तके आणि ग्रंथालयातील साहित्य उत्तम आहे. केंद्राचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे. सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा. या अभिप्रायातून त्यांनी केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 

यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर कांबळे, लघुलेखक कमलेश पाटील, अधीक्षक रघुनाथ सोनवणे, ग्रंथपाल रामेश्वर बरडे, सहाय्यक अधीक्षक राजेश पागदे, सहायक ग्रंथपाल निलेश देशमुख, वरिष्ठ लिपिक प्रशांत शिवरामे, उदय वीर सिंग, किशोर वानखेडे, पाले, किशोर गायकवाड, आमिका महतो, दीपक देशमुख हे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

000000000000

अंजू निमसरकर – माहिती अधिकारी / वृत्त विशेष  -129

आम्हाला फॉलो करा

एक्स - 

https://x.com/MahaGovtMic 

https://x.com/micnewdelhi 

https://x.com/MahaMicHindi

Thursday, 1 May 2025

महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कला सादरीकरणाने ‘महाराष्ट्र दिन’ राजधानीत उत्साहात साजरा







नवी दिल्ली, 1 मे :  महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानी दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गणेशवंदनाआषाढी वारीगोंधळधनगर नृत्यभारूडपोवाडाअभंगदिवलीकोळी नृत्यासह महाराष्ट्र गीत’ अशा विविध समृध्द कलाकृतींचे दमदार सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.

 

दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेट हॉलमध्ये आज महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. दरम्यानपहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी श्री. संजीव कुमारश्री. राजेश अग्रवालश्रीमती सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावारस्मिता शेलारसारिका शेलारपरिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरामाहिती अधिकारी अंजु निमसरकरमहाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक    आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही यानिमित्त राज्याच्या समृद्ध सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने अमये पाटील यांच्या भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स संस्थेच्या  कलाकारांनी 'गर्जा महाराष्ट्र माझाकार्यक्रम सादर केला.

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन

 

श्री गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊ वंदनाछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक गीतमहाराणी ताराराणीपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वंदना गीतआषाढी वारीसादरीकरण झाले. रांगड्या आवाजात डफाच्या तालावर शिवाजी महाराजांच्या पोवाडयाने मनाचा ठेका धरला. आई अंबाबाईचे जागरणगोंधळ सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावले. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे  प्रति‍बिंब उभे केलेकार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  

००००००००००००

अंजू निमसरक,मा.अ./वि.वृ.क्र.98 /दि.01.05.2025


 

महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर नाव चमकणारे राज्य: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 






नवी दिल्ली दिनांक 1 : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भुमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात  राज्यांचा  राज्य आज दिवस आहे. या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत हा प्रवास असाच सुरू राहील असे प्रतिपादन प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी आज येथे केले.

 

 दिल्लीतील उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि  केंद्रीय मंत्री गृह श्री शाह यांच्या प्रमुख महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य दिवस आज  डीडीए असिता ईस्ट पार्कविकास मार्ग येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री शाह बोलत होते. 

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळेकेंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवी यादिल्लीचे तसेच गुजरातचे राज्यमंत्रीमहाराष्ट्र सदन च्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमलामहाराष्ट्र आणि गुजरात चे दिल्ली स्टिक विविध क्षेत्रातील निवासी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता पार्क हे जनतेसाठी खुले करण्यात आले. 

यावेळी श्रीमती आर. विमला यांनी उपराज्यपाल श्री सक्सेना,  केंद्रीय गृहमंत्री श्री शाहश्रीमती रेखा गुप्ता यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

 

ते पुढे म्हणालेगुजरात व महाराष्ट्र यांनीकोणताही वाद न घालताएकाच राज्यातून निर्माण झालेले दोन स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत आणि आरोग्यदायी स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

 

पंतप्रधान मोदींनी "एक भारतश्रेष्ठ भारत" या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून आज विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देतात.

 

व्यक्ती मनोमन ठरवले की फूट निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अंत करायचा आहेतर त्याचे आदर्श उदाहरण मोदींनी "एक भारतश्रेष्ठ भारत" ची कल्पना साकारून दाखवले आहे.

 

महाराष्ट्रही वीर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीत्यांनी आणि बाजीराव पेशव्यांसारख्या सेनानींनी मुगल सत्तेला जबरदस्त प्रतिकार देत स्वराज्यस्वधर्म व स्वभाषेचे रक्षण केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे लोकमान्य टिळकांनी पुढे नेले.

 

सामाजिक सुधारणाभक्ती चळवळ यामध्ये महात्मा फुलेबाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांचे योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले.

 

गुजरातजेथे श्रीकृष्णांनी जीवन व्यतीत केलेतेथे स्वामी दयानंद सरस्वतीमहात्मा गांधी व सरदार पटेल यांसारख्या थोर नेत्यांचा जन्म झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळ घडवून आणली.

 

स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेसाठी व प्रगतीसाठी गुजरात व महाराष्ट्र या राज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज महाराष्ट्रात गरबा तर गुजरातमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. ही परस्पर संस्कृतीची देवाणघेवाण भारताची खरी ताकद आहे.

 

महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असून गुजरातची जीएसडीपी ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बंदररिफायनरीएशियातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्कपहिली बुलेट ट्रेनगिफ्ट सिटी आणि आता धोलेरा स्मार्ट सिटी उभी राहत आहे.

 

वायब्रंट गुजरात आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र हे दोन्ही राज्य भारताच्या विकासाचे मजबूत स्तंभ आहेत. दोन्ही राज्यांनी २०४७ पर्यंतचा आपला विकास आराखडा निश्चित केला आहे.

 

या दोन राज्यांनी आपल्या वारशाचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारले असून देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मोदींनी मांडलेली महान भारताची संकल्पना साकार करण्यासाठी ही राज्ये आरोग्यदायी विकास स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत.

 

२०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेलतेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र यांचा सर्वाधिक वाटा असेल.

 

००००००००००००

अंजू निमसरक,मा.अ./वि.वृ.क्र.97 /दि.01.05.2025


Wednesday, 30 April 2025

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा



















 

नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

 

कस्तुरबा गांधी मार्गस्थित आणि कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीतासोबत राज्य गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ गाऊन ध्वजवंदन केले. 

 

या कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त डॉ. नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरजीत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर व कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागत, दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम

 

दिल्ली शासनाचे उपराज्यपाल कार्यालयातर्फे सायंकाळी महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना,  मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि  केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

 

यावेळी दिल्लीत विविध क्षेत्रांत कार्यरत मराठी भाषिक मान्यवरांशी संवाद साधून त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे.

 

कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याचा जागर करणारा खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या सहकार्याने आणि कोकण हापूस आंबा उत्पादक संघ, देवगड, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 मे दरम्यान भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंब्याचे विक्री प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले. निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

या निमित्ताने ‘महाराष्ट्राचा सुगंधी राजा’ हापूस आंब्याची खरेदी करण्याचीही सुवर्णसंधी दिल्लीकरांना उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांत मराठी आणि अमराठी भाषिक दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक वैभव सर्वांपर्यंत पोहोचणार आहे

 

००००००००००००

अमरज्योत कौर अरोरा/वि.वृ.क्र.96 /दि.01.05.2025

Maha Info Centre, Delhi चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 

 

एक्स - 

https://x.com/MahaGovtMic 

https://x.com/micnewdelhi 

https://x.com/MahaMicHindi

फेसबुक - https://www.facebook.com/share/158d8aFtyi/ 

 युट्यूब -

https://youtube.com/@mahainfocentrenewdelhi?si=ketpBLnSkQRTnAVx 

या लिंकवर फॉलो करा


 

Sunday, 30 March 2025

राजधानीत गुढीपाडवा उत्साहात साजरा गुढीपाडवा सकारात्मकतेचा आणि नवउत्साहाचा सण- सचिव तथा निवासी आयुक्त आर.विमला










नवी दिल्ली, 30: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत, राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू असलेला नववर्ष स्वागताचा सण संपूर्ण देशभर मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात साजरा करण्यात येतो. राजधानी नवी दिल्लीतही महाराष्ट्र सदनाच्या वतीने कॉपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांनी गुढी उभारली. त्यानंतर कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गुढी प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुमनचंद्रा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अन्य वरिष्ठ अधिकारी, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, श्रीमती सारिका शेलार, यांसह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र सदनात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठमोळ्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पुरणपोळी, मसालेभात, सोलकढी यांसारख्या अनेक पारंपरिक पदार्थांचा आस्वाद सर्वानी घेतला.

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत, निवासी आयुक्त आर. विमला यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व यावेळी विशद केले. "गुढीपाडवा हा नवउत्साह, समृद्धी आणि सकारात्मकतेचा सण आहे. महाराष्ट्राबाहेरही तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे," असे म्हणत, त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धीचे आणि आनंददायी जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

00000000000000

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र.84 /दि.30.03.2025

या लिंकवर फॉलो करा

https://x.com/MahaGovtMic