नवी
दिल्ली दि. १७ : सांगली जिल्हयाचे खासदार संजयकाका पाटील यांनी गुरूवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी
त्यांनी परिचय केंद्राच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून देण्यात येणा-या माहितीचे
कौतुक केले.
परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. पाटील यांचे स्वागत
केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाची माहिती घेताना श्री. पाटील यांनी
कार्यालयाच्या ट्वीटर हँडल, फेसबुक, ब्लॉग, गुगलप्लस, युटयुब अकाउंटच्या
माध्यमातून देण्यात येणा-या बातम्या व महत्वाच्या माहितीच्या उपक्रमाबाबत जाणून
घेतले. आधुनिक माध्यमांच्या युगात कार्यालयाने चालविलेला हा उपक्रम कौतुकास्पद
असल्याचे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने
दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने
आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी
दिली. दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी आणि रिपब्लीकन पार्टी ऑफ
इंडिया(आ) चे उपाध्यक्ष
महेंद्र शिर्के यावेळी उपस्थित होते. श्री. पाटील यांना महाराष्ट्र परिचय
केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच
कार्यालयाच्या विविध विभागांना श्री. पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली .
000000
No comments:
Post a Comment