कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात अपर निवासी
आयुक्त समीर सहाय यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, सहायक
निवासी आयुक्त राजीव मलिक, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, सहायक निवासी आयुक्त
अजित सिंग नेगी, यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी
उपस्थित होते. उपस्थित कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली
वाहिली.
स्वातंत्र्य लढयात आपल्या प्राणांची आहुती देणा-या शहीद भगत सिंग,
राजगुरू, सुखदेव यांना महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले. परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी
उपसंचालक श्री कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे तसेच लघु लिपीक कमलेश
पाटील यांनी आजच्या दिनाचे औचित्य तसेच स्वातंत्र्य लढयात शहीदांनी निभावलेली
महत्वपुर्ण भुमिका याचा पुनरोच्चार केला. यावेळी कार्यालयात आलेले अभ्यगंतासह
कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment