नवी दिल्ली दि. २० : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून शुक्रवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली .
कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री. चंद्र यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना “आम्ही,भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत.” अशी दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त अजितसिंग नेगी, संजय आघाव यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी उपस्थित कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. यावेळी कार्यालयात आलेल्या अभ्यागतांसह कार्यालयातील कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 000000
No comments:
Post a Comment