नवी
दिल्ली दि. 16 :
महर्षि वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र
सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस
मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव
आभा शुक्ला यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती
झाडे यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच
महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी
कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात महर्षि वाल्मिकी
यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महर्षि
वाल्मिकी यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून
आदरांजली वाहिली.
000000
No comments:
Post a Comment