नवी
दिल्ली, 06 : महाराष्ट्र
परिचय केंद्रात आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवाद करण्यात आले.
बाळशास्त्री
जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहीले वृत्तपत्र काढून मराठी
वृत्तपत्रांचा भक्कम पाया रचला. पाश्चात्य
विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून जांभेकर यांनी समाजात नवी जीवनमुल्ये रूजविण्यात मोलाचे
योगदान दिले. बाळशास्त्री जांभेकर
यांच्या या योगदानासाठी त्यांचा जन्मदिन ‘मराठी
पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र
परिचय केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे
यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केले. उपस्थित कर्मचा-यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण
करून अभिवाद केले.
00000
No comments:
Post a Comment