अपघातग्रस्तांना राज्यशासनाची सर्वतोपरी मदत
नवी दिल्ली, 06: उत्तराखंड येथे
देव दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्राच्या अमरावती जिल्हृयातील भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून
झालेल्या अपघातात 4 भाविक मृत्युमुखी तर 5 जखमी झाले आहेत, यापैकी 3 गंभीर जखमी आहेत. उत्तराखंडातील बालेश्वर येथील सामुदायिक स्वास्थ्य
केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
ही दुर्घटना रूद्रप्रयाग जिल्हृयातील असून
येथील जिल्हाधिकारी श्रीमती सोनिका यांच्याशी महाराष्ट्र शासनाचे दिल्लीस्थित
निवासी आयुक्त कार्यालय संपर्कात आहे. अपघातग्रस्त भाविकांना सर्वतोपरी मदत
करण्यासाठी निवासी आयुक्त कार्यालय जिल्हा प्रशासनाशी सपंर्कात आहे. मिळालेल्या
माहितीनुसार शनिवार दुपारी 12:30 च्या दरम्यान टेम्पो
ट्रॅव्हल्र गाडी क्रमांक एच.आर. 69बी/2718 ही रूद्रप्रयाग जिल्हृयातील उत्तरकाशी
तहसील लम्बगांव घनसाली तीलवाडा मार्गावरील बालगंगा क्षेत्रातील चंगोरा बँण्ड जवळ टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यामुळे ही
दुर्घटना घडली. गाडीतील सर्व प्रवासी अमरावती जिल्हृयातील आहेत. वाहनचालकसह 10 व्यक्ती
गाडीत होते. स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच आवश्यक ते मदतकार्य केले
जात आहे. मृतांची नावे तसेच जखमींची नावे
खालील प्रमाणे आहेत.
मृत्युमुखी पडलेल्यांची
नावे
1)
श्री चंद्रकांत सीताराम काळकर, वय 56 विद्युतनगर अमरावती
2)
श्रीमती कुंदादेवी चंद्रकांत काळकर, वय 50, विद्युतनगर अमरावती
3) श्रीमती मीनाताई सुधाकर मुरादे, वय 48, विद्युतनगर अमरावती
4) श्री संजय पाटील, वय 57, वसुंधरा कॉलनी अमरावती
गंभीर जखमींची नावे
1) श्री सुधाकर मुरादे वय 55
2) श्रीमती पूर्णिमा
संजय पाटील वय 50
3) श्रीमती अर्चना सतीश
राऊत वय 47
जखमींची नावे
1)
श्री. सतीश राऊत, वय - 53 धामणगाव
2) कु. आर्या सतीश
राऊत वय-16
3
) शहजान हुसैन, वाहन चालक, ज्वालापूर हरीव्दारा,
उत्तराखंड, वय-25
No comments:
Post a Comment