नवी दिल्ली : संत कबीर
आणि रहीमांच्या दोह्यांचे वित्तीय गुंतवणुकिशी सांगड ‘दोहानॉमिक्स’ या पुस्तकात अप्रतिम घातली असल्याची, भावना
खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र परिचय केंद्र आणि बृन्हमहाराष्ट्र मंडळ यांच्या
संयुक्त विद्यमाने परिचय केंद्र येथे विनायक सप्रे लिखित ‘दोहानॉमिक्स, टाईमलेस लेसन फॉर इनवेस्टर्स फार्म संत कबीर ऍण्ड रहीम’
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नरेंद्र जाधव , लेखक विनायक
सप्रे, परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे दिल्ली
स्थित निवासी संचालक प्रफुल पाठक मंचावर उपस्थित होते. यासह पत्रकार, अर्थतज्ञ, अभ्यागत,
परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
‘दोहानॉमिक्स’ हे पुस्तक अंत्यत
वाचणिय असून यामध्ये लेखकाने एखादयाला वित्तिय गुंतवणूक करायची असल्यास कोण-कोणती
काळजी घेतली पाहीजे, यासाठी मार्गदर्शक म्हणून आजच्या काळात संत कबीर आणि रहीम
यांच्यासारखे वित्तीय मार्गदर्शक असावे, असे पुस्तकात लेखकाने नमुद केल्याचे श्री जाधव
यांनी सांगितले.
यासह लेखकाचा
सूक्ष्म अभ्यास या पुस्तकातून दिसून येतो. 3500 दोहे वाचून त्यातील निवडक 40
दोह्यांचे विवेचन या पुस्तकामध्ये केलेलेआहे. वित्तयी गुंतवणूक करताना व्यक्तीला
आनंद मिळावा, हा उद्देश असावा. यासाठी काय उपाययोजना करावी हे ही यापुस्तकात लेखकांने मांडलेले आहे. पुस्तकाची
समीक्षा करत त्यांनी विविध बँकेमध्ये जमा खात्यात किती व्याज दिले जाते याबाबत सविस्तर
दिलेली माहिती ही अधिकच असल्याचेही मत नोंदविले.
पुस्तकामध्ये मध्ययुगीन संत आणि पाश्चात्य वित्तीय
गुंतवणूकदार यांना समोरा-समोर उभे केलेलेआहे. गुरू ही संकल्पना वित्तीय गुंतवणूक सल्लागार
म्हणून सांगण्यासाठी विविध ८ दोहे वापरलेली आहेत, हे विशेष . एखादयाला गुंतवणूकदाराला
त्याचे अंतीम ध्येय निश्चीत करूनच गुंतवणूक केली पाहिजे. ही गुंतवणूक करताना एकाच
ठिकाणी मोठी गुंतवणुकी ऐवजी छोटया-छोटया गुंतवणुका केल्यास त्यात सातत्यासह लांब
पल्ल्याचे लाभही होतील. असेही पुस्तकी नमुद असल्याचा उल्लेख असल्याचे श्री जाधव
यांनी केला.
संत
कबीर आणि रहीम यांचे दोहे गुंतवणुकदारांसाठी मार्गदर्शक : विनायक सप्रे
विनायक सप्रे यांनी त्यांच्या ‘दोहानॉमिक्स’ या पुस्तकाविषयी सांगताना म्हणाले, कबीर आणि रहीम हे असे संत आहे ज्यांचा भारतीय
समाज जीवनावर मोठा सकारात्मक परिणाम झाला असून हे संत कोणत्याही विवादात कधीच
अडकले नाहीत. या पुस्तकाच्या माध्यमातून गुंतवणुकदाराचा स्वभाव लक्षात येतो आणि त्याप्रमाणे
वित्तीय सल्लागाराने सल्ला दिल्यास गुंतवणुकदाराचे कमीत-कमी नुकसान होऊ शकते.
पुस्तकाच्या माध्यमातून संत कबीर आणि संत रहीम यांनी
अनुसरलेली जीवनशैली जर आपणही अंगीकारली तर व्यक्तीसह समाजाचाही फायदाच होईल. गुंतवणुक
करताना सातत्य, शिस्त, आणि धैर्य असणे आवश्यक असल्याचे सांगुण दोह्यातून पुस्तकात नमुद केलेलेआहे. गुंतवणुक
करणे हा प्रवास आहे. यामध्ये बरेच टप्पे येत असतात त्याचा सामना ‘दोहानॉमिक्स’ मधून कसा होऊ शकतो हे लक्षात येईल. ‘दोहानॉमिक्स’ हे पुस्तक सीएनबीसी टिव्ही 18 यांनी
प्रकाशित केलेले आहे.
‘दोहानॉमिक्स’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय केंद्राचे उपसंचालक
दयानंद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, तर
आभार प्रदर्शन बृन्हमहाराष्ट्र मंडळांच्या कवीता नारायणन यांनी केले.
No comments:
Post a Comment